Join us

जगण्याला नवी दिशा देणारी 'लालबागची राणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 16:20 IST

         'टपाल' या सिनेमातून आपले  दिग्दर्शकीय पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी 'लालबागची राणी' हा सिनेमा ...

         'टपाल' या सिनेमातून आपले  दिग्दर्शकीय पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी 'लालबागची राणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या चित्रपटात काम करणा-या वीणा जामकरची यात मध्यवर्ती मुख्य भूमिका असून, जगण्याला नवी दिशा देणा-या 'लालबागची राणी' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. आपल्या कुटुंबापासून हरवलेल्या एका असाधारण मुलीचा मनोरंजक प्रवास यात ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. यापूर्वी 'लालबाग परळ', 'टपाल', 'कुटुंब' 'बायोस्कोप' या सिनेमातून आपल्या अभिनयाचं वेगळपण नेहमीचं जपणाºया वीणाचा लूकही आपल्याला ट्रेलरमध्ये दिसून येतोय. या सिनेमात वीणा 'संध्या नितीन परुळेकर' या स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलीची भूमिका साकारते आहे. लालबागमध्ये राहणारी संध्या सगळ्यांचीच लाडकी असल्यामुळे तीला सर्वांनी  'लालबागची राणी' हे नाव दिले. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विणाने उत्कृष्ट अभिनयाची घट्ट विण बांधलेली दिसत असून तिच्या अभिनय कारकिदीर्साठी हा चित्रपट महत्वाचा ठरेल यात शंका नाही. वीणाने या चित्रपटातील 'संध्याची प्रमुख व्यक्तिरेखा दिल्याबद्दल दिग्दर्शकांचे आभार मानले.  'लालबागची राणी' मधून मी वेगळ्या रुपात लोकांसमोर येणार असून, या रुपात प्रेक्षक मला पसंत करतील अशी अशा बाळगते' असे विणाने सांगितले.