Join us
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्या, हा तू आहेस का? लक्ष्मीकांत बेर्डेंचा डुप्लिकेट पाहून चाहते झाले कन्फ्यूज, यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 18:24 IST

फसलात ना...! हे लक्ष्मीकांत बेर्डे नाही तर त्यांच्यासारखा दिसणारा आहे त्यांचा डुप्लिकेट

एकाच चेहऱ्याच्या आणि सेम टू सेम दिसणाऱ्या सात व्यक्ती जगात असतात असे म्हटले जाते. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. अशा सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही उल्लेख करावा लागणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या या डुप्लिकेटचे टिकटॉकवर अकाउंट असून त्याचे हे व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्यक्तीला पाहून लोक गोंधळून जात आहेत.

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखा दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव धरम राज होलिये असे आहे. हा व्यक्ती औरंगाबादचा आहे. तो स्वतःला ज्युनियर लक्षा असे म्हणतो. त्याचे टिकटॉकवर 39 लाख 89 हजार फॉलोव्हर्स आहेत. तर त्याच्या व्हिडिओंना 5 मिलियन लाइक्स आहेत. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

@dharamrajholiye

काय सांगू ना तुला##foryoupage##foryou##trending##zeemarathiofficial##tik_tok_india##dharamholiye##dharamrajholiye##juniorlaxhya##laxhmikantberde

♬ original sound  - user305328

दरम्यान नुकतेच लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीदेखील त्यांचे व्हिडिओ पाहिले आहेत आणि त्यांचे कौतूक केले.

@dharamrajholiye

अर्धवटराव बोलला की काय##fyp##foryou##foryoupagе##dharamholiye##tik_tok_india##dharamrajholiye #@actordharamrajholiye @sushilkumar_chavan @mangesh.offic

♬ original sound  - मराठी मुलगा

त्याचाही व्हिडिओ धरम राज होलिये यांनी टिकटॉकवर टाकला आहे. त्यात प्रिया बेर्डे म्हणाल्या की, छान वाटतंय. तुम्ही खूप चांगले काम करत आहात. बेर्डेंना आजही लोक विसरलेले नाहीत. त्यांच्यावरील प्रेम तुम्ही पुन्हा जागृत करत आहात. त्यासाठी धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. 

@dharamrajholiye

प्रियाताई बेर्डे यांचा आशीर्वाद मिळाला##foryoupage##fyp##foryou##tiktok##juniorlaxhya##laxhmikantberde##tiktokच_येड##trending##dharamrajholiye##dharamh

♬ original sound - dharamrajholiye

प्रिया बेर्डे यांच्याशी संवाद झाल्यानंतर धरम राज होलिये यांनी टिकटॉकवर ताईसाहेब खूप मोठ्या मनाच्या आहेत. प्रिया ताईंचा आज आशीर्वाद मिळाला असेही त्याने लिहिले आहे. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डेटिक-टॉक