Join us

VIDEO : सिद्धार्थ चांदेकरने घातली लेडीज चप्पल; चाहते म्हणाले, चांदोबा धन्यवाद आहेस तू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:06 IST

Siddharth Chandekar Video : अरे ये...? चक्क लेडीज चप्पल घालून कुठे निघाली सिद्धार्थ चांदेकरची स्वारी?

मराळमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) हा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याचे भन्नाट रील्स पाहतांना धम्माल मज्जा येते. या रील्सवरच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया तितक्याच भन्नाट असतात. नुकताच त्याने  एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे आणि यावरच्या चाहत्यांच्या कमेंट्सही मजेशीर आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ लेडीज चप्पल घालून दिसतोय. ते सुद्धा बायको मितालीची नाही तर एका मैत्रिणीची. आता हा लेडीज चप्पल घालून का फिरतोय? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला पडेल. तर सिद्धार्थने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याचं उत्तरही दिलं आहे. ‘जेव्हा तुम्ही शूज घालून येता आणि पटकन खाली जाऊन यायला कंटाळा करून तुम्ही तुमच्या मैत्रिणीची चप्पल घालून त्या चपलेची...,’असं कॅप्शन सिद्धार्थने या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओत सिद्धार्थ मैत्रिणीची चप्पल घालून लिफ्टमध्ये जातांना दिसतोय.

आता ज्या मैत्रिणीची ही चप्पल आहे, ती कोण तर मुग्धा कर्णिक़ सिद्धार्थने चपलेसाठी तिचे खास आभार मानले आहेत. सिद्धार्थना हा फनी व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. आत्तापर्यंत 16 हजारांवर लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

चाहते म्हणाले...सिद्धार्थच्या या मजेशीर व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. अरे ये... आता परत त्यांनी वापरायच्या नाहीत... वाट लावली..., अशी कमेंट एकाने केली आहे. कठीण आहात तुम्ही लोक, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. चांदोबा, तू काय करशील याचा भरवसा नाही... धन्यवाद आहेस तू... कसं सुचतं तुला हे सगळं... तू भारी, तुझा वेडेपणा पण लईच भारी..., अशी कमेंट एका युजरने केली आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर