Join us

क्रांती रेडकरच्या मुलींना आकाशात दिसले शंकर भगवान, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ, होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 12:08 IST

क्रांतीला जुळ्या मुली आहेत. नेहमी व्हिडीओतून अभिनेत्री लेकींचे किस्से शेअर करत असते. पण, आता क्रांतीने शेअर केलेला व्हिडीओ मात्र खास आहे. क्रांतीच्या लेकींना आकाशात महादेवाची आकृती दिसली.

क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. "कोंबडी पळाली" या गाण्यामुळे क्रांती रातोरात स्टार झाली. क्रांती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक रील व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना ती देत असते. व्हिडीओतून क्रांती तिच्या लेकींच्या मजेशीर गोष्टीही सांगत असते. असाच एक नवीन व्हिडीओ क्रांतीने शेअर केला आहे. 

क्रांतीला जुळ्या मुली आहेत. नेहमी व्हिडीओतून अभिनेत्री लेकींचे किस्से शेअर करत असते. पण, आता क्रांतीने शेअर केलेला व्हिडीओ मात्र खास आहे. क्रांतीच्या लेकींना आकाशात महादेवाची आकृती दिसली. याबाबत क्रांतीने व्हिडीओत सांगितलं आहे. "त्या मला म्हणाल्या मम्मी आकाशात शंकर भगवान आलेत. नमो नमो म्हणा", असं क्रांती व्हिडीओत म्हणत आहे. या व्हिडीओत क्रांतीच्या दोन्ही मुली छबील आणि गोदो दिसत आहेत. आकाशात त्यांना दिसलेले महादेव पाहून त्या खूश असल्याचं दिसत आहे. 

"नमो नमो" असं कॅप्शन देत क्रांतीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांतीने शेअर केलेला हा लेकींचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. क्रांतीने २०१७मध्ये समीर वानखेडेंशी लग्न केलं होतं. २०१८ मध्ये तिने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. झिया आणि झायदा अशी तिच्या लेकींची नावं आहे. लाडाने क्रांती त्यांना छबील आणि गोदो म्हणते. 

टॅग्स :क्रांती रेडकरटिव्ही कलाकार