Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय खन्नासोबत किशोरी शहाणेंनी केलेलं काम, शेअर केला 'तो' व्हिडीओ, म्हणाल्या- "तू ट्रेंडिंग आहेस म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:27 IST

किशोरी शहाणेंनी अक्षय खन्नासोबत एका सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. 'शादी से पहले' या सिनेमात किशोरी शहाणे यांनी अक्षय खन्नाच्या सासूची भूमिका साकारली होती. या सिनेमातील एक कॉमेडी सीन त्यांनी शेअर केला आहे.

'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्ना पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आला आहे. या सिनेमात त्याने पाकिस्तानातील गँगस्टर रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर अक्षय खन्नाच्या एन्ट्री साँगचे व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर फक्त अक्षय खन्ना ट्रेंडिंग आहे. अभिनेत्री किशोरी शहाणेंनी अक्षय खन्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

किशोरी शहाणेंनी अक्षय खन्नासोबत एका सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. 'शादी से पहले' या सिनेमात किशोरी शहाणे यांनी अक्षय खन्नाच्या सासूची भूमिका साकारली होती. या सिनेमातील एक कॉमेडी सीन त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की "अक्षय खन्ना ट्रेंडिंग आहे म्हणून व्हिडीओ शेअर केला. शादी से पहले सिनेमातून आम्ही एकत्र काम केलं होतं. हा कॉमेडी सीन अजूनही आठवतोय". 

शादी से पहले हा सिनेमा २००६ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, आयशा टाकिया, मल्लिका शेरावत, अफताब शिवदासनी, राजपाल यादव, अनुपम खेर, गुलशन ग्रोवर, किशोरी शहाणे अशी स्टारकास्ट होती. या सिनेमात अक्षय खन्नाने आशिश खन्ना ही भूमिका साकारली होती. तर किशोरी शहाणे श्रेया भल्लाच्या भूमिकेत होत्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kishori Shahane shares video with Akshay Khanna, says trending now.

Web Summary : Kishori Shahane shared a comedy scene with Akshay Khanna from 'Shaadi Se Pehle' (2006), where she played his mother-in-law. She posted it, noting Khanna's current popularity due to his role in 'Dhurandar'.
टॅग्स :अक्षय खन्नाकिशोरी शहाणे