Join us

भटक्या कुत्र्यांना पकडतानाचा व्हिडीओ पाहून केतकी माटेगावकरला कोसळलं रडू, म्हणाली - "पोत्यात कोंबल्यासारखं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:53 IST

रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक श्वानप्रेमी नाराज झाले आहेत. दरम्यान आता गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिने इंस्टाग्राम स्टोरीवर संताप व्यक्त केला आहे.

रस्त्यावर फिरणारे भटके कुत्रे ही शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेले आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. तर अनेक लहान मुलं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू पडले आहेत. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तसेच रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक श्वानप्रेमी नाराज झाले आहेत. दरम्यान आता गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिने इंस्टाग्राम स्टोरीवर संताप व्यक्त केला आहे. 

भटक्या कुत्र्यांना पकडून डॉग शेल्टरमध्ये पाठवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाराष्ट्रात या कारवाईला वेग आला आहे. अशातच काही सोशल मीडियावर कुत्र्यांना पकडतानाचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. हे व्हिडीओ पाहून केतकी माटेगावकरला रडू कोसळलं आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत म्हणाली की,"माझं म्हणणं कुणाला पटणार नसेल पण एकेकाळी हिटलरने जसं माणसांना कॅम्पमध्ये डांबून ठेवलं होतं तशीच अवस्था आज या कुत्र्यांची झालेली बघायला मिळत आहे." 

"त्यांना पोत्यात कोंबल्यासारखं पकडत आहेत"केतकी पुढे म्हणाली की, "मला कुत्रा आवडतो म्हणून मी माझ्या घरी तो पाळला आहे. या कुत्र्यांना स्वच्छंदपणे वावरू द्या, निसर्गाच्या सानिध्यात त्यांना राहू द्या. त्यांच्या अंगावर जी फर असते. त्यामुळे ते या ऊन वारा पावसात राहू शकतात. तुम्ही त्यांना  पकडून कुठे ठेवणार आहेत? ते आम्हाला दाखवा, त्यांची काळजी घेणारी कोणी व्यक्ती आहे का तेही सांगा. कालपासून जे व्हिडीओ समोर येत आहेत ते अक्षरशः त्यांना पोत्यात कोंबल्यासारखं पकडत आहेत. आपण गहू, तांदूळ जसं पोत्यातून झटकतो तसं त्यांना झटकलं जातंय. किमान त्यांना व्यवस्थित उचलूनही ठेवू शकतो ना." 

टॅग्स :केतकी माटेगावकरकुत्रा