Join us
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र-अनिल आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 13:52 IST

           जितेंद्र जोशी आणि अनिल कपूर या दोघांचा एक सेल्फी सोशल साईट्सवर नूकताच व्हायरल ...

 
          जितेंद्र जोशी आणि अनिल कपूर या दोघांचा एक सेल्फी सोशल साईट्सवर नूकताच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये आपला मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी झक्कास अभिनेता अनिल कपूर सोबत दिसत आहे. या फोटोला जितेंद्रच्या चाहत्यांकडून अनेक लाईक््स मिळत आहेत. एका कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आणि अनिल कपूर यांची भेट झाली. या सुंदर क्षणाला कायमचे बंदिस्त करण्यासाठी जितूने लगेचच सेल्फी काढला. तसेच अनिल कपूर एकदम झक्कास अभिनेता असल्याचे त्याने सांगितले. एवढेच नाही तर अनिल मध्ये अफलातून एनर्जी असल्याने जितू चांगलाच भारावून गेल्याचे त्याने टविट करून सांगितले. या फोटोमध्ये तर जितू आणि अनिल एकदमच भारी दिसत आहेत. पाहूयात आता ही जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतेय का.