Join us

'जलसा' मधून निळू फुलेंना श्रद्धांजली!-

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 14:29 IST

आगामी ‘जलसा’  मराठी  चित्रपटाच्या ऑफिशिअल पोस्टर दाखवण्यात आले होते. आता या चित्रपटाने सोशल मिडीयावर टिझर प्रदर्शित केला आहे.अमर आणि ...

आगामी ‘जलसा’  मराठी  चित्रपटाच्या ऑफिशिअल पोस्टर दाखवण्यात आले होते. आता या चित्रपटाने सोशल मिडीयावर टिझर प्रदर्शित केला आहे.अमर आणि प्रेम या दोन तरुणांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना जास्त वाव देऊन पसंतीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेले हे दोन पात्र. या चित्रपटातील बाई वाड्यावर या या गाण्यातून निळू फुले यांना श्रध्दांजली देण्यात आली आहे. आशुतोष राज, निखिल वैरागर यांच्यासह भारत गणेशपुरे, गिरीजा जोशी, शितल अहिरराव, सोनाली विनोद, सागर कारंडे, अभिजीत चव्हाण, अरुण कदम आणि अंकुर वाढावे या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. तसेच अभिनेत्री मानसी नाईक प्रमुख पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे.