Join us

भगवान दादांचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 15:54 IST

 भगवान दादा..सिनेसृष्टीतले एक असे रसायन जे प्रत्येक जण प्यायले आहे. त्यांचा अभिनय, त्यांची डान्सिंग स्टाइल, त्यांचे फाइट सिक्वेन्सेस सगळ्याचीच ...

 भगवान दादा..सिनेसृष्टीतले एक असे रसायन जे प्रत्येक जण प्यायले आहे. त्यांचा अभिनय, त्यांची डान्सिंग स्टाइल, त्यांचे फाइट सिक्वेन्सेस सगळ्याचीच जादू प्रेक्षकांवर व्हायची. केवळ प्रेक्षकच नाही तर सिनेसृष्टीतले कलाकारही या भगवान दादांचे दिवाणे होते...भगवान दादा सिनेसृष्टीतल्या कित्येक कलाकारांसाठी एक प्रेरणा होते....मिल कामगाराच्या घरी जन्माला आलेला भगवान आबाजी पालव...याने बघता बघता अवघ्या सिनेसृष्टीवर आपले साम्राज्य पसरवले...भगवान दादा आज हयात नसले तरी त्यांच्या ब?्याच गोष्टी सिनेसृष्टीला पुरून उरल्या भगवान दादांनी सिनेसृष्टीला विनोदाची मालमत्ता दिली...एक काळ असा होता...जिथे विनोदवीरांच्या यादीत भगवान दादा अव्वल स्थानी होते. या कॉमेडीच्या बादशहाने सुरूवात केली स्टंटपटांपासून...आपले आखाड्यातले कर्तब पडद्यावर उतरवत हा अवलिया घराघरांत पोहोचला आणि सिनेसृष्टीचा भगवान झाला... याच दरम्यान स्टंटपट बनवता बनवता त्यांनी भेदी बंगला नावाचा पहिला हॉररपट केला. हाच मोर्चा पुढे वळला सोशल सिनेमांकडे...आणि दादांनी साकारला अलबेला... या सगळ्या प्रवासात त्यांच्या डान्सिंग स्टाइलपासून ते क्शन सिक्वेन्सेस पर्यंत प्रत्येक गोष्ट नवोदीत कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरली. राज कपूर यांच्यासाठी भगवान दादांची शॉट घेण्याची पध्दत अजब होती तर गुरू दत्त, दादांच्या कॅमेरा अँगल्वर फिदा होते. या कलाकारांनी आपआपल्या परिने भगवान दादांच्या गुणांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि उत्तमोत्तम सिनेमे दिले. इंडस्ट्रीला साध्या-सरळ नृत्याची देणगी भगवान दादांनी दिली. कठीण स्टेप्स करूनच नृत्य करता येते हा गैरसमज भगवान दादांनी मोडीस काढला. आपल्या अनोख्या नृत्यशैलीच्या जोरावर अख्या इंडस्ट्रीला नाचवले. वर्ष उलटली आणि भगवान दादांची डान्सिंग स्टाइल भगवान दादा तोड म्हणून ओळखली जाऊ लागली. या तोडची जादू अशी काही झाली की इंडस्ट्रीत येणारे नवखे कलाकार यांतूनच प्रेरणा घेऊ लागले.  सिनेसृष्टीत नृत्यदिग्दर्शनासाठी भगवान दादांनीच दारे उघडली. भगवान दादांच्या पुढच्या पिढीसाठी कोरीओग्राफी करणा?्या कमल मास्टर यांनी अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर यांच्यासाठी भगवान दादा स्टाइल कोरीओग्राफ केली आणि भगवान दादांच्या नृत्याने प्रेरित झालेल्या या कलाकारांनी ती आत्मसात करून नाव कमावले. यांची पुढची पिढी म्हणजे गोविंदाच्या पिढीतही हा प्रभाव जाणवला. तर अशा कित्येक कलाकारांना काही तरी देऊ केलेल्या भगवान दादांनी सिनेइंडस्ट्रीतल्या सुलतानलाही काही देऊ केले होते. पूर्वीच्या काळी राजे आपली तलवार ज्याप्रमाणे आपल्या सुपुत्राकडे सुपूर्त करत...जेणेकरून हा वारसा पुढे चालू राहावा...असेच काहीसे या भगवानने सुलतानसोबत केले. हा बॉलिवूडचा सुलतान सलमान खान याचा पहिला झ्र वहिला सुपरहिट चित्रपट मैंने प्यार किया...या चित्रपटात या बॉलिवूडच्या भगवान ने सुलतान ला पगडी देऊ केली आणि आता यापुढे हा सुपरहिट सिनेमांचा वारसा तू चालव असा आशिर्वाद दिला. याच आशिवार्दाच्या जोरावर हा सुलतान आजतागायत हिट वर हिट सिनेमे देत आहे. तर अशा या अलबेल्या भगवान दादांवर सिनेमा येतोय एक अलबेला...मंगलमूर्ती फिल्मस आणि किमया मोशन पिक्चर्स घेऊन येत असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने या अवलियाचे आयुष्य आपल्या नजरेसमोरून पुन्हा एकदा सरकणार आहे....शेखर सरतांडेल दिग्दर्शित हा एक अलबेला येत्या 24 जूनला आपल्या भेटीला येणार आहे.