Join us

संकेत करतोय दोस्तीगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 14:28 IST

  सध्या मालिकेमध्ये हिट होत असलेला अभिनेता म्हणजे दुहेरी या मालिकेतील प्रमुख कलावंत संकेत पाठक. सध्या मालिकांमधील प्रमुख कलाकार ...

  सध्या मालिकेमध्ये हिट होत असलेला अभिनेता म्हणजे दुहेरी या मालिकेतील प्रमुख कलावंत संकेत पाठक. सध्या मालिकांमधील प्रमुख कलाकार भलतेच सुपरहिट होताना दिसत आहेत. आता हे छोट्या पडदयावरील सुपरस्टार महाराष्ट्रातील घराघरात अगदी सहजपणे पोहचु लागले आहेत. मालिकांमुळे नवोदित कलाकारांना अल्पावधीतच प्रसिदधी मिळते. आता हेच पाहा ना, संकेत लवकरच रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. बरेच छोट्या पडदयावरील कलाकारांनी मोठ्या पडदयावर झेप घेतलेली आपण पाहिलीच आहे. आज चित्रपटसृष्टीत सुपरस्टार असलेले कितीतरी कलाकार हे छोट्या पडदयानेच दिले आहेत हे काही नाकारता येणार नाही. संकेत देखील आता त्याची सेकेंड इनिंग सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. मालिकेचे चित्रीकरण सुरु असतानाच संकेतने दोस्तीगिरी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

 

 संतोष पानकर निर्मित आणि विजय शिंदे  दिग्दर्शित दोस्तीगिरी हा मराठी चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे कथानक मैत्री भोवती गुंफण्यात आल्याचे समजतेय.  विनोद, नाट्य, प्रेम, भावनिकता असे अनेक पैलु उलगडवणारा दोस्तीगिरी या चित्रपटात संकेतची भूमिका काय असणार हे मात्र अजुनतरी गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटाची कथा ही चार मित्रांची आहे. संकेत पाठक सोबत, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पूजा जैस्वाल अशी दमदार तरूण नवोदित कलावंत या चित्रपटात झळकणार आहेत. त्याशिवाय शुभांगी लाटकर आणि  शरद पोंक्षे हे लोकप्रिय कलावंतही चित्रपटात पाहायला मिळतील. रोहन-रोहन यांनी दोस्तीगिरी मधील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर आनंद शिंदे , आदर्श शिंदे, सावनी रविंद्र, प्राजक्ता शुक्रे ,मिनल जैन, रोहन गोखले, रोहन प्रधान, कविता निकम यांनी गाणी गायली आहेत.