Join us

सुखी आणि आनंदी जीवन जगायचंय,तर तेजश्री प्रधान काय सांगतेय ते ऐका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 15:27 IST

तेजश्रीबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. ‘ती सध्या काय करते’ या तिच्या सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणे तिच्याविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे.

छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान. होणार सून मी या घरची या मालिकेतील तेजश्रीच्या या भूमिकेनं रसिकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेनं रसिकांचा निरोप घेतला असला तरी तेजश्रीनं साकारलेली जान्हवी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. त्यामुळे तेजश्रीबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. ‘ती सध्या काय करते’ या तिच्या सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणे तिच्याविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे. 

ती कोणत्या मालिकेत, नाटकात किंवा सिनेमात काम करते याबाबत माहिती घेण्याची तिच्या फॅन्सना उत्सुकता असते. तेजश्रीचे लाखो फॅन्सला तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावरील तेजश्रीचा एक फोटो आणि पोस्ट सध्या साऱ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरला आहे. काळ्या रंगाचा वनपीस आणि त्यावर तपकिरी रंगाचं जॅकेट परिधान केलेली तेजश्री आणि तिच्या चेहऱ्यावरील घायाळ करणारं स्मित हास्य सोशल मीडियावर साऱ्यांना भावतंय. या फोटसह तिने एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आनंदी जीवन जगण्याचा तिचा मंत्रा सांगितला आहे. 

निश्चित राहा आणि योग्य वेळेवर विश्वास ठेवा या मथळ्याखाली तिने आनंदी जीवनाचं गमक सांगितलं आहे. योग्य करियर, विश्वासू नातेसंबंध तसंच तुम्ही जे आहात आणि जे व्हायचंय ते हवं असेन तर स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला बिल्कुल कमी लेखू नका. या गोष्टींमुळे सुखी आणि आनंदी जीवन जगू शकता असाच काहीसा मंत्रा तेजश्रीने सोशल मीडियावरुन दिला आहे. तिच्या या फोटो आणि पोस्टवर तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहे. 

एरव्ही आपल्या मेकअप केलेल्या लूकने सा-यांना घायाळ करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान मात्र विनामेकअप लूकही सा-यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.तिच्या सोशल मीडिया पेजवर बिनधास्तपणे स्वतःचे नो मेकअप लूकमधील सेल्फीज पोस्ट कलेले पाहायला मिळतात. या फोटोंमुळे प्रत्यक्षात तेजश्री विना मेकअप राहणे पसंत करते असे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन समजते. त्यामुळे मेकअप असो किंवा तेजुचा अंदाज हा चिअरफुल लूक सा-यांची वाहवा मिळवताना पाहायला मिळत आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान