मी कात टाकली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 15:35 IST
चित्रपटातील भुमिका या प्रेक्षकांच्या कायम लक्षात रहाव्यात अन त्या अभिजात कलाकृती म्हणुनच ओळखल्या ...
मी कात टाकली...
चित्रपटातील भुमिका या प्रेक्षकांच्या कायम लक्षात रहाव्यात अन त्या अभिजात कलाकृती म्हणुनच ओळखल्या जाव्यात असे ेप्रत्येक कलाकारालाच वाटते. आपल्याला एखादा आऊट आॅफ बॉक्स रोल करायला मिळावा अशई ईच्छा प्रत्येकाचीच असते. गब्बर, मागँबो, हवाहवाई हे कॅरेक्टर्स तर आत्ताचे पा चित्रपटातील अमिताभ बच्चन, बर्फि मधील प्रियांका चोप्रा तर पिकु या चित्रपटासाठी अमिताभजींनी केलेला मेकओवर पाहुन त्यांची ती भुमिका प्रेक्षकांनी विसरणे शक्यच नाही. असेच मेकओवर आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत देखील पहायला मिळाले आहेत. बनवाबनवी चित्रपटामध्ये केवळ भुमिकेसाठी स्त्रीवेश धारण करणारे सचिन पिळगावकर त्या लुकमध्ये अगदीच भाव खाऊन गेले. तर बालगंधर्व , मी सिंधुताई सपकाळ, ७२ मैल एक प्रवास, बकुळा नामदेव घोटाळे, जबरदस्त, परतू, असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये कलाकारांनी केवळ भुमिकेसाठी कात टाकली आहे. अशाच काही चित्रपटांचा सीएनएक्सने घेतलेला आढावा. बालगंधर्व : बालगंधर्वांची गोष्ट रुपेरी पडद्यावर रंगवायची म्हणजे बालगंधर्व तितक्याच ताकदीने साकारणारा नट देखील आवश्यक असणारच. फक्त अभिनयच नाही तर बालगंधर्वांप्रमाणे एखाद्या स्त्री ला लाजवेल असे सौंदर्य असणेही गरजेचे होते. परंतू बालगंधर्वांच्या भुमिकेमध्ये जेव्हा सुबोध भावे सगळ््यांच्या समोर आले तेव्हा त्यांच्या साडीतील रुपाने प्रेक्षक अवाक झाले. सुबोध भावेंचा या भुमिकेसाठी केलेला मेकओवर जबरदस्त होता. साडी, दागिने अन मेकअप मध्ये सजलेल्या या बालगंधर्वकडे पाहताना त्याचे आरस्पानी सौंदर्य डोळ््यात साठल्याशिवाय राहत नाही. भुमिकेसाठी साडी घालुन अनेक कलाकारांनी काम केले आहे. परंतू सुबोधने साकारलेले बालगंधर्व कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतील मी सिंधुताई सपकाळ : सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर चित्रपट काढणे म्हणजे खरच चॅलेंजच असणार. ज्या स्त्रीने जगण्यासाठी जीवाची एवढी धडपड केली अन आज समाजासमोर खंबीरपणे उभी राहिली अशा व्यक्तीचे जीवन पडद्यावर दाखविण्यासाठी निवड करण्यात आली तेजस्वीनी पंडितची. सिंधुताईंना पडद्यावर जिवंत करण्यासाठी तेजस्वीनीने अक्षरश: स्वत:ला सिंधुताईंच्या रुपात ढाळले अन ती सिंधुताईंना जगली. साध्या नऊवारी साडीमध्ये विदाऊट मेकअप तेजस्वीनीने साकारलेली सिंधुताई थेट मनाला भिडते. तिचा अभिनय अन चित्रपटातील संवाद तर अप्रतिमच आहेत परंतू सिंधुताई वास्तववादी वाटण्यासाठी गरज होती तेजस्वीनीच्या एकंदरीतच मेकओवरची. २३ ते ४० वयातील सिंधुताईंना तेजस्वीनीने चित्रपटात उभेउभ साकारुन सिनेमा वेगळ््या उंचीवर नेला. तेजस्वीनीच्या या भुमिकेचे सगळीकडेच कौतुक झाले. ७२ मैल एक प्रवास : स्मिता तांबे नेहमीच वैविध्यपुर्ण भुमिका साकारणारी अभिनेत्री राहीली आहे. तिने आत्तपर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये ती स्वत:च हिरो होती असे म्हणायला काहीच हरकत नाही. ७२ मैल एक प्रवास या चित्रपटामध्ये स्मिताने साकारलेली भुमिका वास्तवाच्या जवळ जाणाली अन काळजाला चटका लावणारी आहे. काही गोष्टी पडद्यावर दाखविताना त्या ड्रॅमॅटीक न वाटता रिअॅलिस्टीक वाटणे अतिशय गरजेचे असते तरच तो चित्रपट प्रेक्षकांना अपील होतो. स्मिताने देखील ७२ मैल मध्ये एका ग्रामीण स्त्रीची भुमिका साकारताना या गोष्टींची काळजी घेतल्याचे दिसते. फाटक्या नऊवारी साडीमध्ये मुलांसोबतचा तिचा प्रवास पाहताना अंगावर शहारे येतात. कोणत्याही प्रकारचा मेकअप न करता हा रोल तिने केला आहे. स्मिताच्या या वेगळ््या भुमिकेमुळे अनेक पुरस्कारांची मोहोर देखील या चित्रपटावर उमटली आहे. लोकमान्य एक युगपुरुष : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक् आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणाºया बाळ गंगाधर टिळक यांची भुमिका मोठ्या पडद्यावर साकारणे काही सोपे काम नाही. परंतू सुबोध भावे यांनी स्वत:ला अगदी टिळकांच्या वेशभुशेत रंगवुन लोकमान्य एक युगपुरुष या सिनेमामध्ये टिळकांची भुमिका अतिशय रिअॅलिस्टीक पद्धतीने साकारली. सुबोधला पडद्यावर टिळक साकारण्यासाठी मदत धाली ती फक्त मेकअप मुळे टिळकांची पगडी, धोतर, कुरता, शाल या सगळ््या गोष्टी त्याने व्यवस्थित कॅरी केल्या अन लोकमान्य टिळकांना पडद्यावर उभे केले. अगडबम : नवरा-बायकोच्या नात्यातील तणाव केवळ पत्नी अगडबम असल्यामुळे येतो अशी कथा रंगविणारा अगडबम हा सिनेमा प्रेक्षकांना फारच आवडला. यामध्ये तृप्ती भोईरने साकारलेली व्यक्तीरेखा खरच दाद देण्यासारखी होती. नवºयापेक्षा बायको जाड दिसण्यासाठी तृप्तीने अंगावर चढवलेला किलो किलोचा मेकअप अन अशा अगडबम लुकमध्ये केलेला अभिनय खरच अफलातुन होता. ही भुमिका पडद्यावर फक्त रिअल झाली ती मेकअप आर्टीस्टच्या कमालीमुळे.