Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसे आहे एक शून्य तीन नाटकचे मोशन पोस्टर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 11:41 IST

असेच एका नाटकाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या नाटकाचे नाव आहे एक शून्य तीन. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता सुमित राघवन हा पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच सुमितसोबत या नाटकात चुलबुली अभिनेत्री स्वानंदी टिकेकरदेखील असणार आहे. नुकतेच स्वानंदी व सुमितने या नाटकाचा एक मोशन पोस्टरचा व्हिडीओ अपलोड केला आहे.

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटकांचे प्रमाण वाढत जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. एकापाठोपाठ एक नवीन नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. असेच एका नाटकाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या नाटकाचे नाव आहे एक शून्य तीन. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता सुमित राघवन हा पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच सुमितसोबत या नाटकात चुलबुली अभिनेत्री स्वानंदी टिकेकरदेखील असणार आहे. नुकतेच स्वानंदी व सुमितने या नाटकाचा एक मोशन पोस्टरचा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यांच्या या मोशन व्हिडीओ पोस्टरला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स व कमेंन्ट मिळताना दिसत आहेत. तसेच स्वानंदी व सुमितच्या या हटके जोडीचेदेखील सोशल मीडियावर कौतुक करण्यात आले आहे. तसेच त्यांना आगामी नाटकासाठी खूपसाºया शुभेच्छादेखील देण्यात आले आहेत.  नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक दिग्दर्शित एक शून्य तीन हे नाटक आहे. रहस्यमय आणि थरारक असे हे नाटक असणार आहे. यांचा अंदाज प्रेक्षकांना या नाटकाच्या मोशन पोस्टरच्या व्हिडीओमधून आलाच असेल. या नाटकात अभिनेता सुमीत राघवन पत्रकार आणि रिसर्चरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर स्वानंदी टिकेकर या नाटकात कम्प्युटर एक्स्पर्टच्या भूमिकेत दिसणार आहे. बडी दूरसे आये है या लोकप्रिय मालिकेत व्यस्त असलेला हा अष्टपैलू अभिनेता लेकुरे उदंड झाली या नाटकानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर आपल्या अभिनयाची बहार उडवायला सज्ज झाला आहे. तर स्वानंदीदेखील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अशा या हटक्या जोडीच्या नाटकाचा शुभारंभ ३ डिसेंबरला करण्यात येणार आहे.