‘नटसम्राट’ चा हिंदी रिमेक लवकरच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 11:33 IST
नाना पाटेकर यांचा उत्तम अभिनय असलेला ‘नटसम्राट... असा नट होणे नाही’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. १ ...
‘नटसम्राट’ चा हिंदी रिमेक लवकरच...
नाना पाटेकर यांचा उत्तम अभिनय असलेला ‘नटसम्राट... असा नट होणे नाही’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. १ जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याने बॉक्स आॅफीसवर ४० कोटींची कमाई केली.महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये चित्रपट आजही तुफान कमाई करतो आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात नटसम्राट चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्यानिमित्त नटसम्राटच्या टीमने एक पार्टी केली. चित्रपटातील कलावंत आणि इतर सेलिब्रिटी हे देखील पार्टीत उपस्थित होते.यावेळी नाना पाटेकर, महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, अंकुश चौधरी, मानसी नाईक, वंदना गुप्ते, आदिनाथ कोठारे, समित कक्कड आणि इतरजणही होते. चित्रपटाचा हिंदी रिमेकही लवकरच येणार असल्याची चर्चा सुरू आहे.