गॉडफादर नसताना ही बॉलीवुडमध्ये झाला हिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 19:31 IST
बॉलीवुड असो या मराठी इंडस्ट्री या ठिकाणी आपले स्थान निर्माण करायचे असेल तर गॉडफादर असणे आवश्यक असते. पण नगर ...
गॉडफादर नसताना ही बॉलीवुडमध्ये झाला हिरो
बॉलीवुड असो या मराठी इंडस्ट्री या ठिकाणी आपले स्थान निर्माण करायचे असेल तर गॉडफादर असणे आवश्यक असते. पण नगर या छोट्या खेडयातील हिरो गौरव ठिपसे हा अभिनेता कोणताही गॉडफादरचा हात नसताना देखील केवळ आपल्या प्रयत्नाने बॉलीवुडपर्यत मजल मारलेली दिसत आहे. गौरवने नुकतेच सौरभ वर्मा दिग्दर्शित सेव्हन अवर्स टू गो हा बॉलीवुड चित्रपट केला आहे.यामध्ये त्यासोबत संदीपाधर व नताशा हे कलाकार पाहायला मिळाले. तसेच गौरव सध्या बिनधास्त या वाहिनीवर लाइफ लफडे बधियॉं या मालिकेतदेखील काम करत आहे. त्याचबरोबर गौरवच्या आतंरराष्ट्रीय स्तरावरच्या काही जाहिराती प्रदर्शित होण्याच्या मार्गावर देखील आहे. मराठमोळया गौरवची ही मेहनत पाहता नक्कीच तो यशाच्या उंच शिखरावर पोहचेल अशी अपेक्षा करूयात.