Join us

"जगात कुठंही जा… कितीही देश बघा!", हेमंत ढोमेचं गाव माहिती आहे का? शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:55 IST

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेदेखील सध्या आपल्या गावी रमला आहे.

गावचं शिवार शेती अन् माती म्हणजे गावची खरी ओळख... आपण जरी शहरात राहत असलो तरी, गावची ओढ कमी होत नाही. गावची आठवण येतच राहते. मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. प्रत्येकाला आपलं गाव प्रिय असतं. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेदेखील सध्या आपल्या गावी रमला आहे. फिल्म इंडस्ट्रीत काम करत असला, ग्लॅमरस जगाशी जोडलेला असला तरी त्याची गावाशी जोडलेली नाळ कायम आहे. 

हेमंत ढोमे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आताही त्याच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. हेमंतनं चाहत्यांबरोबर गावाकडील खास फोटो (Village Photos) शेअर केले आहेत.  यातून त्याच्या शेताची आणि गावची खास झलक पाहायला मिळते. 

हेमंत फोटोना दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, "जगात कुठंही जा… कितीही देश बघा!आपल्या वावरातून दिसणारा view जगात भारी! पाटलांचं वावर! वावरच पावर!". त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.  पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात (Shirur) हेमंत ढोमेचं पिंपरखेड (Pimparkhed) हे गाव आहे. तो कायम गावाकडचे फोटो शेअर करत असतो. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नवीन वर्षात हेमंत नवा चित्रपट घेऊन येत आहे. 'फसक्लास दाभाडे' असं चित्रपटाचं नाव आहे.  त्याने आतापर्यंत पोस्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, झिम्मा, झिम्मा २ यांसारखे दर्जेदार चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. हेमंत कायमच त्याच्या बेधडक, स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असतो. हेमंत नेहमी सामाजिक समस्यांविषयी भाष्य करताना दिसतो. 

टॅग्स :Hemant Dhome Today Newsपुणेशिरुर