Join us
Daily Top 2Weekly Top 5

एथनिक लूकमध्ये हिना पांचाळ दिसली खूपच सुंदर, पाहा तिचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 07:15 IST

हिना पांचाळ सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. नुकताच हिनाने तिचा एथनिक लूकमधील फोटो शेअर केला आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे. 

हिना पांचाळ सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. नुकताच हिनाने तिचा एथनिक लूकमधील फोटो शेअर केला आहे. ज्यात ती सुंदर दिसते आहे. हिनाच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केली आहे.

 हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.  हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

टॅग्स :हिना पांचाळ