Join us

मराठी अभिनेत्रींच्या बोल्ड अदा, सई, प्रिया, मुक्तासह या अभिनेत्रींनी दिले बिनधास्त Kissing Scene

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 15:48 IST

सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर या अभिनेत्रींनी बिकिनी परिधान करुन हम भी किसीसे कम नही... असे दाखवून दिले त्यात एक पाऊल पुढे टाकत मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर किसींग सीन्स देतानानाही दिसले.

बोल्ड सीन, किसिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. हिंदीप्रमाणेच हळूहळू या गोष्टी  मराठी सिनेमातही दिसू लागल्या. मराठी सिनेसृष्टीसुद्धा बोल्ड सीन्सने धुमाकुळ घातला आहे. काळानुसार मराठी चित्रपटसृष्टी पूर्णपणे बदलून गेली आहे. म्हणूनच की काय सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर या अभिनेत्रींनी बिकिनी परिधान करुन हम भी किसीसे कम नही... असे दाखवून दिले त्यात एक पाऊल पुढे टाकत मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर किसींग सीन्स देतानानाही दिसले.

भूमिकेची गरज म्हणून अनेकदा असे सीन्स अभिनेत्रींना द्यावे लागतात. असे सीन शूट करताना मर्यांदा पार होणार नाहीत, रसिकांनाही ते रुचणार नाहीत अशा कोणत्याच आत्रेपार्ह गोष्टी होणार नाहीत याचीही काळजी घेतली जाते. 'शॉर्टकट' या सिनेमात अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने अभिनेता वैभव तत्ववादीसोबत लिप लॉक सीन दिला होता तेव्हा या सीनमुळे सिनेमाची जोरदार चर्चा झाली होती. 

ऑनस्क्रीन आपल्या सहकलाकारासोबत इंटिमेट होणारी संस्कृती पहिली अभिनेत्री नाहीये. या यादीत मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, अमृता सुभाष, उर्मिला कानेटकर, प्रिया बापट, अभिनेत्री तेजश्री प्रधान या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्रींनी पडद्यावर बिनधास्तपणे आपल्या सहकलाकारासोबत लिपलॉक सीन्स दिले आहेत. विशेष म्हणजे हे सीन्स व्हल्गर वाटणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली गेली होती.

 

तेजश्री प्रधानने दिलेला पहिला ऑनस्क्रीन किसीग सीनचीही चुफान चर्चा झाली होती ‘बबलू बॅचलर’ या सिनेमात  तेजश्रीने शर्मन जोशीसोबत किसिंग सीन दिला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले होते. 

'हंटर' सिनेमात सईने केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. या सिनेमात तिने अतिशय बोल़्ड सीन्स दिल्यामुळे ती प्रचंड चर्चेत होती. या सिनेमात सईसह राधिका आपटेही झळकली होती. सिनेमात किचनमध्ये सईने दिलेल्या किसींग सीनमुळे सर्वांना चकित केले होते. तुम्ही कुटंबासोबत हा सीन पाहूच शकणार नाही. या सीनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

टॅग्स :सई ताम्हणकरतेजश्री प्रधान