Join us

ऋजुता देशमुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2016 23:40 IST

कळत नकळत या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिचा आज वाढदिवस. ऋजुता देशमुखने अगदी वयाच्या चौथ्या ...

कळत नकळत या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिचा आज वाढदिवस. ऋजुता देशमुखने अगदी वयाच्या चौथ्या वर्षापासून मराठी इंडस्ट्रीट पाउल ठेवले. तिने नशीबवान व एक गाडी बाकी अनाडी या मराठी चित्रपटामध्ये बालकलाकराची भूमिका पार पाडली होती. तसेच एका पेक्षा एक, राजा शिवछत्रपती-सई बाई, महाराष्ट्राचे नच बलिऐ या मालिकेत देखिल ऋजुता प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली होती. मराठी इंडस्ट्रीच्या या सुंदर अभिनेत्रीला लोकमत सीएनएक्सच्यावतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.