Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 13:14 IST

सोन परी उर्फ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस. मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी काम केले ...

सोन परी उर्फ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस. मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली.

दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेतून मृणाल यांनी अभिनयाला सुरुवात केली.  राजवाडे अँड सन्स, तुझ्या-माझ्यात, रमा माधव, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, कशाला उद्याची बात, यल्लो, अ रेनी डे आदी मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. तर आशिक, राम गोपाल वर्मा की आग, रास्ता रोको, छोडो कल की बातें, मेड इन चायना आदी हिंदी चित्रपटात काम केले आहे. 

सोन परी या मालिकेतून सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं मृणाल यांनी मन जिंकलं. तसेच राजा शिवछत्रपती, मीरा, स्पर्श, गुंतता ह्रदय हे, रिश्तें आदी हिंदी आणि मराठी मालिकेत काम केले.

अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा