Join us

क्या बात है! 'गुलकंद'चा गोडवा आणखी वाढला, अवघ्या ६ दिवसांमध्ये सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:53 IST

'गुलकंद' सिनेमा हाउसफुल्ल प्रतिसादात सुरु असून सिनेमाने किती कमाई केली? जाणून घ्या (gulkand)

 'गुलकंद' सिनेमाची (gulkand movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. सई ताम्हणकर-समीर चौघुले,  प्रसाद ओक- ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय.  'गुलकंद' सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक-लेखक जोडीने सिनेमाचं चांगलंच प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा  'गुलकंद' सिनेमाला झालेला दिसतोय.  'गुलकंद' सिनेमाने अवघ्या ६ दिवसात जबरदस्त कमाई केली आहे. जाणून घ्या

 'गुलकंद' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

 'गुलकंद' सिनेमाच्या टीमने सिनेमाच्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलाय. या रिपोर्टमध्ये दिसतंय की,  'गुलकंद' सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल २.०२ कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच अवघ्या आठवडाभरात  'गुलकंद' सिनेमाने २ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत, त्यामध्ये  'गुलकंद' सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायी वातावरण निर्माण झालं आहे. बुक माय शोवर  'गुलकंद' सिनेमाची दर तासाला १००० तिकीटं बूक होत आहेत, असा रिपोर्ट आहे.

 'गुलकंद' सिनेमाविषयी

'गुलकंद' सिनेमात समीर चौघुले-सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक-ईशा डे यांच्या जोड्या प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस उतरल्या आहेत. या सिनेमातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. सहा दिवसात २ कोटींची कमाई करणाऱ्या 'गुलकंद' सिनेमाचा कमाईचा आकडा आणखी कसा वाढतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :समीर चौगुलेसई ताम्हणकरप्रसाद ओक मराठी चित्रपटमराठी अभिनेता