मराठी सेलेब्रिटींचा भगवान दादा स्टाइल डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 14:35 IST
भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित एक अलबेला हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठी कलाकारदेखील उत्साहाने लागलेले दिसत आहे. नुकतेच पूजा सावंत, अकुंश चौधरी, प्रथमेश परब, भाऊ कदम, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, गणेश आचार्या, रेमो डिसुजा, अमितराज अशा अनेक कलाकारांनी भोली सुरत दिल के खोटे या गाण्यावर भगवान दादा स्टाईलमध्ये डान्स करतानाचा डबस्मॅश केला आहे.
मराठी सेलेब्रिटींचा भगवान दादा स्टाइल डान्स
भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित एक अलबेला हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठी कलाकारदेखील उत्साहाने लागलेले दिसत आहे. नुकतेच पूजा सावंत, अकुंश चौधरी, प्रथमेश परब, भाऊ कदम, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, गणेश आचार्या, रेमो डिसुजा, अमितराज अशा अनेक कलाकारांनी भोली सुरत दिल के खोटे या गाण्यावर भगवान दादा स्टाईलमध्ये डान्स करतानाचा डबस्मॅश केला आहे. हा डबस्मॅश सोशलमिडीयावर हिट होताना दिसत आहे. असाच कलाकारांचा झिंगाट गाण्यांचा व्हिडीओ देखील सैराट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरला गेला होता. अशा पद्धतीचा हा नवीन प्रमोशन फंडा प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र उतरताना दिसत आहे.