Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्चीत दिसली वैजयंतीमाला यांची झलक !

By admin | Updated: August 30, 2016 14:09 IST

'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुनं सध्या रसिकांवर मोहिनी घातलीय. ती जिथं जाईल तिथे चाहत्यांचा गराडा तिच्याभोवती जमा होतो.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुनं सध्या रसिकांवर मोहिनी घातलीय. ती जिथं जाईल तिथे चाहत्यांचा गराडा तिच्याभोवती जमा होतो. तिच्या फॅन्सना आवरण्यासाठी तर चक्क बाऊन्सर आणि पोलिसांनाही पाचारण करावं लागलंय. रुपेरी पडद्यावरील आर्चीची अशी क्रेझ वाढत असताना एका वाहिनीवरील कार्यक्रमातील तिच्या लूकमुळे वेगळी चर्चा रंगलीय. 
 
या कार्यक्रमात परफॉर्मन्समधला आर्चीच्या लूकमध्ये अनेकांना हिंदी चित्रपटसृष्टीच्या ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला यांची झलक दिसली. 'वडकई' या तमिळ सिनेमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वैजयंतीमाला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय आणि नृत्यानं रसिकांची मनं जिंकली.  
 
दोन दशकांहून अधिक काळ हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणा-या वैजयंतीमाला या प्रसिद्ध नृत्यांगणासुद्धा होत्या. त्यामुळं अभिनयासह त्यांच्या नृत्याचीही कायम चर्चा व्हायची. आता आर्ची अर्थात रिंकूच्या त्या परफॉर्मन्समुळं अनेकांना वैजयंतीमाला यांची झलक दिसलीय. त्यामुळं तिच्यासाठी ही तुलना नक्कीच नवी प्रेरणा देणारी म्हणावी लागेल.