Join us
Daily Top 2Weekly Top 5

"नॅशनल क्रश टायटल प्लीज चोरा", गिरीजा ओक असं का म्हणाली? लोकप्रियतेच्या लाटेबद्दल मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:14 IST

गिरीजा ओक हिने 'नॅशनल क्रश' या टॅगवर आपलं स्पष्ट मत मांडलं.

 Girija Oak Talk About National Crush Title : मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे. निळ्या साडीतील तिची एक मुलाखत व्हायरल झाली आणि तिचा लूक, बोलण्याची स्टाईल आणि साधेपणा चाहत्यांना खूपच भावला. तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत असते. अशातच या टायटलवर प्रतिक्रिया देताना गिरीजाने हे "'नॅशनल क्रश'चं टायटल कुणीतरी चोरून घेऊन जा", असं म्हटलं. तसेच "प्रसिद्धी ही एका लाटेसारखी असते, ती येते आणि जाते" असं म्हणत तिने या टॅगबद्दल विशेष मोह नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

गिरीजाने नुकतंच अमोल परचुरे यांच्या 'कॅचअप' मुलाखतीत तिने या प्रसिद्धीच्या वलयावर आपलं मत मांडलं. ती म्हणाली, "मी हल्लीच एका पेजवर पाहिलं की बऱ्याच मराठी अभिनेत्रींना असं विचारण्यात आलं की, तुम्हाला कोणाकडून काय चोरावंसं वाटेल? त्यापैकी बहुतेक जणींनी गिरीजा ओककडून म्हणजेच माझ्याकडून माझं नॅशनल क्रशचं टायटल चोरावंसं वाटेल असं उत्तर दिलं. तर, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. मी तर म्हणेन प्लीज चोरा! प्लीज घेऊन जा... हा खूप छान अनुभव आहे"

पुढे ती म्हणाली, "नॅशनल क्रश झाल्यावर अर्थात खूप मजा येते. खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात. अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात. पण, मी याआधी सुद्धा सांगितलं आहे आणि माझ्या एका लेखातही मी म्हटलं होतं की, याला प्रसिद्धीची लाट म्हणतात. खरंच ही प्रसिद्धी एका लाटेसारखीच असते ती येते आणि मग ती लाट जाते सुद्धा. त्यामुळे आपण या गोष्टीची देखील तयारी ठेवली पाहिजे की, ही लोकप्रियता जशी आलीये, तशी ती कधीतरी ओसरणार सुद्धा आहे. त्यानंतर मग पुन्हा तुमचं नॉर्मल आयुष्य सुरू होईल", असे मत गिरीजाने मांडलं.

गिरीजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती 'हॅलो बच्चो'या नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकली. याशिवाय गिरिजाच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'परफेक्ट फॅमिली' आणि 'इन्स्पेक्टर झेंडे' या सीरिजना देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. गिरीजाने 'तारे जमीन पर','शोर इन द सिटी','जवान' या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Girija Oak: 'National Crush' title? Please steal it!

Web Summary : Actress Girija Oak reacts to being called 'National Crush,' saying she's happy for others to take the title. She views fame as a wave that comes and goes, emphasizing the importance of normalcy after the hype fades. She was recently seen in 'Hello Bachcho'.
टॅग्स :गिरिजा ओक