Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री गिरीजा ओकने शेअर केला मुलासोबतचा Cute फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 14:44 IST

मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले.

मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. नेहमीच तिचे चाहते तिच्या अभिनयाच्या प्रेमात तर पडतातच मात्र आता तिच्या सोज्वळ सौदर्यांच्या प्रेमातही पडले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून गिरीजा नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.

 गिरीजाने काही दिवसांपूर्वी मुलगा कबीर सोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या सेल्फिमध्ये गिरीजासोबत कबीरसुद्धा दिसतो आहे. गिरीजा आणि कबीरच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

जाहिराती, मालिका, सिनेमा, नाटक यानंतर गिरीजा शॉर्टफिल्मच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आली होती. सोशल मीडियाच्या युगात तर कलाकारांपुढची आव्हानं आणखी वाढली आहेत. त्यामुळेच कोणत्याही माध्यमात भूमिका साकारत आव्हान पेलण्याची कलाकारांची तयारी असते. असंच आव्हान गिरीजाने पेलले होते.

‘क्वॉर्टर’ या शॉर्टफिल्ममध्ये ती झळकली होती. यांत गिरीजाचा वेगळा लूक रसिकांना पाहायला मिळाला. आजवर विविध माध्यमांतून वेगवगेळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यास मिळाल्या असल्या तरी ‘क्वॉर्टर’मधली भूमिका अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचेही गिरीजाला सांगितले होते.

टॅग्स :गिरिजा ओक