मराठीसह बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक. आतापर्यंत तिने हिंदी, मराठी मालिकांसह सिनेमा, वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. एका मुलाखतीमधील गिरिजा ओकचे फोटो काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झाले. ज्यामुळेच तिला 'नॅशनल क्रश' हा टॅगसुद्धा मिळाला. ज्यानंतर हिंदीतील बहुतांश लोकांना तिची नव्याने ओळख झाली. मात्र, हे 'नॅशनल क्रश' होणं तिला व्यावसायिकदृष्ट्या किती फायदेशीर ठरले, याबद्दल गिरीजाने मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
नुकत्याच अमोल परचुरे यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गिरीजानं सांगितलं की, तिने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त जाहिरातींमध्ये काम केलं आहे. मात्र, नॅशनल क्रशचा टॅग मिळाल्यापासून तिच्या जाहिरातींची संख्या घटली आहे. याचं कारण सांगताना ती म्हणाली, "जाहिरातींमध्ये अशा चेहऱ्यांची गरज असते जे फार नवीन नसतात, पण फार प्रसिद्धही नसतात. अचानक तुम्हाला खूप लोक ओळखू लागले की, तुम्ही घरातील सामान्य स्त्री वाटत नाही. या 'नॅशनल क्रश' टॅगमुळे मी ती घरगुती इमेज गमावून बसले आणि परिणामी माझ्या जाहिरातींची कामं कमी झाली".
जेव्हा तिला विचारण्यात आलं की, या टॅगमुळे तुझ्या हाती नक्की काय लागलं? तेव्हा तिने कबूल केलं की, "मला फक्त फॉलोअर्स मिळाले". मात्र, याचा एक सकारात्मक पैलू म्हणजे ती मोठ्या प्रमाणावर अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. ज्यांनी कधी तिचे चित्रपट पाहिले नव्हते, त्यांनी या टॅगमुळे तिचे जुने काम शोधून पाहिले, याचा तिला आनंद आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतर लोकांच्या बदलणाऱ्या वृत्तीबद्दल ती म्हणाली, "हा अनुभव मजेदार होता. या प्रसिद्धीकडे जास्त लक्ष दिलं तर लोक म्हणतात की हिच्या डोक्यात हवा गेली. आणि जर महत्त्व दिलं नाही, तर म्हणतात की ही तुझी मेहनत आहे, तू श्रेय घेतलं पाहिजे. ही एक मोठी कसरत असते".
Web Summary : Girija Oak says the 'National Crush' tag decreased ad opportunities. While gaining followers and wider recognition, she lost her relatable, 'girl-next-door' image, impacting her career. She acknowledges increased viewership from non-Marathi audiences discovering her past work.
Web Summary : गिरिजा ओक का कहना है कि 'नेशनल क्रश' टैग से विज्ञापन के अवसर कम हो गए। फॉलोअर्स और व्यापक पहचान हासिल करने के बावजूद, उन्होंने अपनी 'आस-पड़ोस की लड़की' वाली छवि खो दी, जिससे उनके करियर पर असर पड़ा। वह गैर-मराठी दर्शकों द्वारा उनके पुराने काम की खोज को स्वीकार करती हैं।