Join us  

Ved Marathi Movie : रितेश देशमुखने ‘वेड’च्या चाहत्यांना दिलं आणखी एक सरप्राईज, ‘सुख कळले’ गाण्याचं नवं व्हर्जन रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:16 PM

Sukh Kalale New Version, Ved Marathi Movie : होय, काही तासांपूर्वी ‘सुख कळले’ या आणखी एका गाण्याचं नवं व्हर्जन रितेशने त्याच्या इन्स्टाअकाऊंटवर शेअर केलं आहे.

Sukh Kalale New Version, Ved Marathi Movie  : रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुख ( Genelia Deshmukh) ‘वेड’ हा सिनेमा गेल्या ३० डिसेंबर प्रदर्शित झाला. तेव्हापासून या सिनेमानं जणू वेड लावलं आहे. अद्यापही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला, मात्र प्रेक्षकांनी एक नाराजीही व्यक्त केली होती. रितेश-जिनिलिया यांचं एकही रोमँटिक गाणं सिनेमात नसल्यामुळे प्रेक्षक नाराज होते. रितेशने प्रेक्षकांची ही नाराजी लगेच दूर करत ‘वेड तुझा’ गाण्याचे सत्या-श्रावणी व्हर्जन प्रदर्शित केलं. इतकंच नाही तर ते सिनेमाच्या एक्सटेंडेड व्हर्जनमध्ये समाविष्ट केलं.  आता रितेश व जिनिलियाने ‘वेड’च्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिलं आहे. होय, काही तासांपूर्वी ‘सुख कळले’ या आणखी एका गाण्याचं नवं व्हर्जन रितेशने त्याच्या इन्स्टाअकाऊंटवर शेअर केलं आहे. सुख कळले’चं अजय गोगावले व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. 

चित्रपटात श्रावणीचं एकतर्फी प्रेम दाखवणारं ‘सुख कळले’ हे गाणं तुफान हिट झालं. हे गाणं श्रेया घोषालने गायलं होतं. आता याच गाण्याचं नवं व्हर्जन मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा संगीतकार आणि गायक अजय गोगावलेच्या आवाजात ऐकायला मिळतेय. अजयच्या आवाजातील हे गाणंही चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. 

‘वेड’ हा मराठी सिनेमा रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा आहे. अजय अतुल जोडीनं या चित्रपटाला संगीत दिलं आहे. चित्रपटातील वेड तुझा, वेड लावलंय, बेसुरी, सुख कळले ही गाणी तुफान गाजली. चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला.

'वेड'ने जगभरात ७३. ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. देशात या चित्रपटाने ६०.२४ कोटींचा बिझनेस केला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. आता 'वेड' ८० कोटींकडे वाटचाल करत आहे. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरल्या. पहिल्या क्रमांकावर अर्थात अजूनही नागराज मंजुळेंंचा 'सैराट' आहे.

  

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखमराठी अभिनेतामराठी चित्रपट