Join us

तेरा पता! गौतमी पाटीलचा रोमॅंटिक अंदाज, थेट हरयाणवी गाण्यातून आली चाहत्यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:16 IST

Gautami Patil : खान्देश कन्या लावणी क्वीन गौतमी पाटील हिने तिच्या नृत्याने वेड लावले आहे. गावागावात सध्या तिच्या कार्यक्रमांना ...

Gautami Patil : खान्देश कन्या लावणी क्वीन गौतमी पाटील हिने तिच्या नृत्याने वेड लावले आहे. गावागावात सध्या तिच्या कार्यक्रमांना भरघोस गर्दी होत आहे. आता गौतमी हरयाणवी गाण्यातून धुरळा उडवायला सज्ज झाली आहे. 'तेरा पता 'हे तिचं पहिलंच हरयाणवी गाणं समोर आलं आहे. यात गौतमीचा कातिल अंदाज बघायला मिळत आहे. सबसे कातिल गौतमी पाटील अशा कमेंट्स गौतमी करताना दिसत आहे.  गौतमीच्या रुपावर आणि नृत्यावर अख्खा महाराष्ट्र फिदा झालेला आहे. तरुणाईमध्ये तर तिचे प्रचंड वेड आहे. आता गौतमीच्या या नव्या गाण्यालाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून गौतमीने नवीन गाण्याची झलक दाखवत चाहत्यांना आतुर केले होते. आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.'तेरा पता'हे हरयाणवी भाषेतील रोमॅंटिक गाणं आहे.  तिच्या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. 

'क्रेझी आर'ने हे गाणं गायलं आहे. नीरज गोयतसह गौतमीने गाण्यात रोमान्स केला आहे. गौतमीच्या चाहत्यांना तर गाणं प्रचंड पसंतीस पडलं आहे. तर काही नेटकऱ्यांना मात्र गाणं अजिबात आवडलं नसून गौतमी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलही होत आहे.

गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :नृत्यधुळेसोशल व्हायरलसोशल मीडिया