Join us

"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:25 IST

हिंदी सक्तीवरुन काही सेलिब्रिटींनी सरकारला धारेवर धरलं आहे. हेमंत ढोमे, समीर चौघुले यांनी पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. आता निळू फुलेंची लेक अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. 

सध्या राज्यात हिंदी सक्तीवरुन घमासान सुरू आहे. शालेय अभ्यासात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सगळीकडूनच विरोध होत आहे. हिंदी सक्तीवरुन काही सेलिब्रिटींनी सरकारला धारेवर धरलं आहे. हेमंत ढोमे, समीर चौघुले यांनी पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. आता निळू फुलेंची लेक अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. 

गार्गी फुले यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा, तीही पहिलीपासून शिकायला लावणारे महाराष्ट्र हे जगातील एकमेव उदाहरण आहे", असं गार्गी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. "हिंदी भाषा सक्ती मान्य नाही आम्हाला...निषेध...तीव्र निषेध", असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, सरकारने जीआर काढत राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. हिंदी भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची असल्यास २० पेक्षा जास्त विद्यार्थी हवेत. अन्यथा तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवण्यात येईल, असं जीआरमध्ये म्हणण्यात आलं होतं. 

टॅग्स :निळू फुलेदेवेंद्र फडणवीस