Join us

​F.U. म्हणजेच Friendship Unlimitedचा Teaser प्रेक्षकांच्या भेटीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 11:55 IST

F.U. म्हणजेच Friendship Unlimited या चित्रपटाचा भव्य Teaser Launch सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. सोशल मीडियावर तर काहीच तासात 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज या टीझरला मिळाले आहेत.

फ्रेश लूक, न संपणारी एनर्जी, रोमान्स, तरुणाईचा अॅटीट्युड आणि फूल ऑफ लाइफने भरलेल्या या वर्षातील सर्वात धमाकेदार अशा F.U. म्हणजेच Friendship Unlimited या चित्रपटाचा भव्य Teaser Launch सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. सोशल मीडियावर तर काहीच तासात 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज या टीझरला मिळाले आहेत. F.U.च्या या पहिल्याच Lookवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.सैराटच्या भव्य यशानंतर प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसरचा F.U. या चित्रपटात आपल्याला एक ट्रेंडी लुक पाहायला मिळत आहे. आकाशबरोबरच या टीझरमध्ये सत्या मांजरेकर, मयूरेश पेम, शुभम किरोडीयन, माधव देवचक्के, पवनदीप, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, स्वामिनी वाडकर, रिया बर्मन, राधा सागर, मधुरा देशपांडे, स्वरदा ठिगळे हे तरुण कलाकार दिसत आहेत. त्याचसोबत सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, भारती आचरेकर आणि महेश मांजरेकर या अनुभवी कलाकारांचीदेखील या चित्रपटात फौज पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बोमन इराणी आणि इशा कोप्पीकर हे बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकारसुद्धा या चित्रपटात आहेत. नटसम्राट, ध्यानीमनी या आशयघन चित्रपटानंतर महेश मांजरेकर तमाम तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्रांचा आणि आजच्या तरुणाईची भाषा बोलणारा F.U  हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या टीझर लाँचच्या निमित्ताने फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रेटीदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी एकत्र आले होते. टी-सिरिजचे भूषण कुमार आणि किशन कुमार हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून टी-सिरिज कंपनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील प्रसिद्ध वितरक अनिल थडानी F.U.चे वितरण करत आहेत. भूषण कुमार आणि अनिल थडानी यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली होती. या टीझरच्या लॉचिंग प्रसंगी संगीतकार विशाल मिश्रा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल 'यूलिया' हिने बहारदार गाण्याचे सादरीकरण केले आणि त्यानंतर F.U.च्या धमाकेदार गाण्यावर आकाश ठोसर आणि सर्व तरुण कलाकारांनी नृत्य सादर केले.या चित्रपटाला विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर यांनी अतिशय युथफूल संगीत दिले आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिजित देशपांडे यांच्या साथीने या चित्रपटाचे लेखनसुद्धा केले आहे. F.U.ची निर्मिती अभय गाडगीळ, महेश पटेल, दिनेश किरोडीयन आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे.