Join us

स्पृहाचे पहिले रौप्य पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 14:43 IST

 लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड, पैसा पैसा यासारख्या चित्रपटातून स्पृहाने नेहमीच आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तर आपल्या कवितांमुळे स्पृहाने प्रेक्षकांच्या ...

 लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड, पैसा पैसा यासारख्या चित्रपटातून स्पृहाने नेहमीच आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तर आपल्या कवितांमुळे स्पृहाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. अशा या सुंदर अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्पृहाने महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाटयस्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकाविले आहे. हे पदक तिला डोण्ट वरी बी हॅपी या नाटकासाठी मिळाले आहे. हे तिचे पहिले रौप्य पदक असल्याचे स्पृहाने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले आहे. स्पृहा म्हणाली, राज्यशासनाचा हा पुरस्कार प्रत्येक कलाकारासाठीच खूप मानाचा असतो. त्यामुळे हे पदक मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. तसेच उमेश कामतला या नाटकासाठी उत्कृष्ट अभिनेता, मिहीर राजदा यांना उत्कृष्ट लेखक,अव्दैत दादरकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शक असे पुरस्कार मिळाले आहेत. एवढेच नाही तर आमच्या तांत्रिक टीमला देखील पुरस्कार मिळाला असून नाटकाला पण प्रथम क्र्रमांक मिळाल्याने आमची पूर्ण टीमच खूप आनंदी आहे.