Join us

आधी काम मग आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 12:18 IST

मराठी इंडस्ट्रीची गायिका नेहा राजपाल ही निर्माती बनण्यास सज्ज झाली आहे. लवकरच तिचा फोटोकॉपी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार ...

मराठी इंडस्ट्रीची गायिका नेहा राजपाल ही निर्माती बनण्यास सज्ज झाली आहे. लवकरच तिचा फोटोकॉपी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेहाचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे ती हा चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहोचविण्याची एक ही संधी सोडणार नसल्याचे दिसत आहे.  कारण नेहाने नुकताच हाताला आयव्ही असून ही गणपतीचे दर्शन घेतानाचा फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. या फोटोविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना नेहा सांगते, फोटोकॉपी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली कित्येक दिवस माझा संपूर्ण महाराष्ट्र दौरा चालू आहे. यामुळे माझी खूप दगदग झाली आहे. या प्रवासामुळे मला किडनी इन्फेक्शन झाले होते. यासाठी मी गणपती बसण्याच्या दोन दिवस आधी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाले होते. पण घरी गेली दहा वर्षापासून गणपती बसण्याची परंपरा आहे. या परंपरेला तोडण्याची  माझी बिलकूल इच्छा नव्हती. म्हणून डॉक्टरांच्या परवानगीने डिचार्ज घेण्याचा निर्णय घेतला. आणि घरातूनच उपचार चालू ठेवले. त्यामुळे मला गणपतीच्या प्रतिष्ठापनेमध्ये सहभागी होता आले. यावेळी गणपतीची छोटी पूजा केली. आणि त्यांच्या कृपेने माझी तब्येत हळूहळू पूर्ववत होत आहे. तसेच आई व पतीने काळजी घेतल्यामुळे मला लवकर बरे होता आले आहे. नुकतेच मी माझ्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्येदेखील सहभागी झाले आहे. आता, यापुढे ही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उत्साहाने सहभागी होणार आहे. आधी काम मग आराम हाच विचार मनात ठेवून चित्रपटाच्या प्रमोशनवर भर देणार आहे.