शूटच्या पहिल्याच दिवशी झालं स्नेहाच रॅगिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 16:23 IST
लाल इश्क या चित्रपटात आपल्याला एक सुंदर चेहरा पहायला मिळणार आहे. या नव्या हिरोईनचे नाव ...
शूटच्या पहिल्याच दिवशी झालं स्नेहाच रॅगिंग
लाल इश्क या चित्रपटात आपल्याला एक सुंदर चेहरा पहायला मिळणार आहे. या नव्या हिरोईनचे नाव आहे स्नेहा चव्हाच. करिअरच्या सुरुवातीलाच एवढा मोठा चित्रपट हाती लागल्याने ती नक्कीच खुष आहे. याबद्दल ती सांगते, लाल इश्कच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव धमाल आणि अविस्मरणीय होता. आम्ही सेटवर भरपूर मस्ती करायचो आणि तितकीच खादाडीसुध्दा. मी प्रथमच सिनेमात काम करत असल्याने मस्ती म्हणून सर्वांनी माझं रॅगिंग करायचं ठरवलं. माझा पहिला सीन शूट करण्याच्यावेळेस सर्वांनी मला सांगितंल कॅमेरामनला पहिल्यांदा एकशे एक रुपए देऊनच सीनला सुरूवात करायची आणि मी खरोखरच एकशे एक रुपए कॅमेरा दादांना दिले व मागून सर्वजण एकच कल्ला करत हसत होते. हा धमाल क्षण मी कधीच विसरू शकणार नाही लाल इश्क सिनेमातील पहिल्या-वहिल्या ब्रेकबद्दल बोलताना अभिनेत्री स्नेहा चव्हाण म्हणाली, संपूर्ण झक्कास हिरॉईन टीमची आभारी आहे, त्यांनी मला ही सुवर्णसंधी दिली. स्वप्निल जोशी हा नायक आणि संजय लीला भन्साली यांचा मराठी सिनेमा यापेक्षा मोठं व्यासपीठ माज्यासाठी असूच शकत नाही, स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित आणि शबिना खान निर्मित लाल इश्क हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. सिनेमात मी सेकंन्ड लीड आहे. श्रेया असं माज्या भूमिकेचं नाव आहे.