Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'रिंगण' सिनेमा या तारखेला झळकणार रूपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 12:41 IST

वितरक न मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित रहावं लागत आहे. या यादीतील काही नावं म्हणजे 'कासव', 'दशक्रिया', 'हलाल'... ...

वितरक न मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित रहावं लागत आहे. या यादीतील काही नावं म्हणजे 'कासव', 'दशक्रिया', 'हलाल'... याच यादीत काही दिवसांपूर्वी अजून एक नाव होतं 'रिंगण'... मात्र या दुष्टचक्रातून 'रिंगण' चित्रपटाची मुक्तता झाली आहे.सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात 63 वा राष्ट्रीय पुरस्कारावर रिंगण आपली मोहोर उमटवली त्याबरोबरच 53व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्करांवर आपले नाव कोरले आहे. त्याशिवाय कान्स, स्टट्टगर्ट (जर्मन), लंडन, टोरांटो या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिलं. या राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारा रिंगण अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.आपली निर्मिती प्रेक्षकांसाठी मनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधि कासलीवाल यांनी प्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी उमेद जागवणारा,मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ प्रेक्षकांना प्रेझेंट करायचे ठरवले आहे. 'रिंगण' 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.खरंतर विधीने आपल्या पहिल्याच सिनेमापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर यांना घेऊन 'सांगतो ऐका नावाचा' सिनेमाही तिने बनवला होता. या सिनेमालाही रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर 'वजनदार' हा सिनेमा बनवला. या सिनेमालाही रसिकांनी डोक्यावर घेतलं. विशेष म्हणजे सिनेमातून  लहानापांसून थोरांपर्यंत प्रत्येकाला पांडुरंगाचे दर्शन घडणार आहे.