Join us
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीवर ‘मन की बात ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 07:43 IST

पंतप्रधांनाची ‘मन की बात’ तर तुम्ही रेडिओवर ऐकतच असाल. मात्र आता मराठी रंगभूमीवर तुम्हाला ‘मन की बात’ पाहायला मिळणार ...

पंतप्रधांनाची ‘मन की बात’ तर तुम्ही रेडिओवर ऐकतच असाल. मात्र आता मराठी रंगभूमीवर तुम्हाला ‘मन की बात’ पाहायला मिळणार आहे. प्रतिक कोल्हे यांनी लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत.आधुनिक जोडप्याची कथा यामध्ये मांडण्यात आली आहे. आपल पत्नीच्या चारित्र्याविषयी संशयी असणाºया नवºयाची कशी घालमेल होते, असा नाटकाचा विषय राहणार आहे.संतोष कोल्हे निर्मित या नाटकात अक्षय शिंपी, केतकी विलास, पूर्णानंद, नम्रता सुळे, जयेश शेवळकर, आनंद प्रभू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लोकनृत्यांनी सजलेल्या या नाटाकाचे नृत्यदिग्दर्शन सिद्धेश दळवी यांनी तर संगीत रित्विक गौतमी शंकर यांचे आहे.प्रतीक कोल्हेने लिहिलेले हे पहिलेच नाटक आहे. सध्या तो खाजगी वाहिनीमध्ये नॉन फिक्शन प्रमुख आहे. मुंबई विद्यापीठातून त्याने नाट्यशास्त्रात शिक्षण पूर्ण केलेले आहे.