नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'फँड्री' चित्रपट (Fandry Movie) २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून जब्या आणि शालू हे कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. सिनेमा रिलीज होऊन इतके वर्ष उलटले असले तरी हे कलाकार आजही तितकेच चर्चेत येत असतात. सिनेमात जब्याची भूमिका सोमनाथ अवघडे(Somnath Awghade)ने साकारली आहे तर शालूची भूमिका राजेश्वरी खरात(Rajeshwari Kharat)ने. राजेश्वरी खरात सातत्याने चर्चेत येत असते. अलिकडेच तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे चर्चेत आली होती. दरम्यान आता तिने संजू राठोडच्या 'एक नंबर, तुझी कंबर...' या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. यात ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये संजू राठोडचं ट्रेडिंग गाणं 'एक नंबर, तुझी कंबर...'वर थिरकताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अभिनेत्री दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस राजेश्वरी खरात सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ती आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. आता तिच्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. तिचा बदललेला लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. ते तिच्या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत. राजेश्वरी खरात दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे आणि तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली आहे.