मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता आणि चाहत्यांचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधवने नव्या नाटकातून मराठी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. सिद्धार्थ ‘ॲनिमल’ नाटकातून आठ वर्षांनंतर रंगमंचावर पुनरागमन करत असून या वेळी त्याचा प्रवास केवळ एका प्रयोगापुरता मर्यादित नसून सलग प्रयोगांच्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडत आहे. या नाटकाच्या प्रयोगदरम्यान सिद्धार्थला त्याच्या चाहत्याकडून खास सरप्राइज मिळालं.
सिद्धार्थ जाधवच्या टीममधील एक सदस्य आणि त्याच्या चाहत्याने थेट हातावरच सिद्धार्थ जाधवच्या चेहऱ्याचा टॅटू काढून त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं. हे पाहून सिद्धार्थही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सिद्धार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याने त्याच्या हातावर माझा टॅटू काढला. टॅटू म्हणजे नाव नव्हे तर माझा चेहरा त्याने काढला आहे. हे भारावलेपण आहे".
दरम्यान, ठाणे, बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड अशा विविध नाट्यगृहांमध्ये ‘ॲनिमल’चे सलग प्रयोग सादर होणार असल्याने या नाटकाकडे रंगभूमीप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे. ‘ॲनिमल’ हे नाटक महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित असून सिद्धार्थ जाधव या प्रयोगात दुहेरी भूमिकेत आहे. विशेष म्हणजे ते या नाटकाचे निर्मातेही आहेत. आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या ‘ताराराम’ या निर्मिती संस्थेची ही पहिली निर्मिती असून, या नाटकातून त्या संस्थेचा रंगभूमीवरील प्रवास सुरू होत आहे.
नाटकाची कथा दत्तू या तरुणाभोवती फिरते. छोट्या गावातून मुंबईत आलेला हा तरुण अभिनेता होण्याचं स्वप्न पाहतो. मात्र शहरातील स्पर्धा, अस्थिरता, नात्यांमधील अंतर आणि मानसिक ताण यांच्या घुसमटीत त्याचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा होत जातो. एका व्यक्तीच्या मनात चालणारी ही झुंज रंगमंचावर एकपात्री शैलीत साकारली जाणार आहे.
Web Summary : Siddharth Jadhav, returning to Marathi theater after eight years with 'Animal,' received a surprise. A fan tattooed Jadhav's face on his arm, moving the actor. 'Animal' explores a young actor's struggles in Mumbai. The play is written and directed by Mahesh Manjrekar.
Web Summary : सिद्धार्थ जाधव, आठ साल बाद 'एनिमल' के साथ मराठी थिएटर में लौटे, को एक सरप्राइज मिला। एक फैन ने जाधव का चेहरा अपनी बांह पर गुदवाया, जिससे अभिनेता भावुक हो गए। 'एनिमल' मुंबई में एक युवा अभिनेता के संघर्षों की पड़ताल करता है। नाटक महेश मांजरेकर द्वारा लिखित और निर्देशित है।