Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ही प्रसिद्ध मराठी गायिका अडकली विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 14:19 IST

गायिका सावनी रविंद्रचे नुकतेच पुण्यात लग्न झाले. काल पुण्यातील शुभारंभ लाँन्स येथे सावनी ठरावीक मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकली. ...

गायिका सावनी रविंद्रचे नुकतेच पुण्यात लग्न झाले. काल पुण्यातील शुभारंभ लाँन्स येथे सावनी ठरावीक मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकली. सावनीच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील देखील तिचे जवळचे अनेक मित्रमैत्रीण उपस्थित होते. सावनीच्या मित्रमैत्रिणींनी सावनीच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एवढेच नव्हे तर सावनीने देखील फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या प्रोफाईलमध्ये तिचे लग्न आशिष डांगेसोबत झाले असल्याचे लिहिले आहे. आशिष पेशाने डॉक्टर आहे. आशिष हा मुळचा पुण्याचा असून त्याचे सगळे शिक्षण देखील पुण्यात झाले आहे. आशिष आणि सावनीचा मार्च महिन्यात साखरपुडा झाला होता. सावनीने लग्नात नऊवारी घातली होती तर रिसेप्शनला ती घेरदार वन पीसमध्ये दिसली. तिच्या या दोन्ही लूकमधील फोटो तिच्या मित्रमैत्रिणींनी फेसबुकला शेअर केले आहेत. या तिच्या फोटोंवर तिच्या फॅन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. सावनी ही खूप चांगली गायिका म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम समज असे कमालीचा कॉम्बो सावनीच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळतो. सावनीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये देखील खूप गाणी गायली आहेत. काही दिवसांपूर्वी तिचे वेन्निलविन सालईगलिल हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्स मिळताना दिसत आहे. सावनी रविंद्रच्या घरी संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे येणं-जाणं कायम असायचे. त्यातलं एक मोठ्ठं नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी. त्यांच्याकडे बघून, ऐकून सावनी तयार झाले. वयाच्या १४व्या वर्षापासून ती त्यांच्यासोबत गाणी गावू लागले. हृदयनाथजी यांच्यासोबत ती अनेक वर्षं प्रोफेशनली गात होती आणि २०११ मधील ‘झी सारेगमप’ मध्ये सहभागी झाले. आणि त्या सीजनची ती फायनलिस्ट ठरली होती. होणार सून मी या घरची या मालिकेच्या शीर्षकगीतामुळे ती नावारूपाला आली. Also Read : ​लता मंगेशकर आणि अाशा भोसले यांच्या गाण्यावर आधारित सावनी रवींद्र सादर करणार लताशा