Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive अमितराज आणि श्रेया घोषाल एकत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 12:53 IST

 बेनझीर जमादारप्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. त्या व्यक्तीचे ते स्वप्न पूर्ण झाले की, त्या व्यक्तीचा आनंद गगनात मावेनसा ...

 बेनझीर जमादारप्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. त्या व्यक्तीचे ते स्वप्न पूर्ण झाले की, त्या व्यक्तीचा आनंद गगनात मावेनसा होतो. असेच एक स्वप्न संगीतकार अमिराजचे पूर्ण झाले आहे. कारण प्रेक्षकांचा लाडका संगीतकार अमितराज आणि बॉलिवूडची तगडी गायिका श्रेया घोषाल ही जोडी एका चित्रपटासाठी एकत्रित आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना यावेळी काहीतरी भन्नाट ऐकण्यास मिळणार आहे असे वाटते. या चित्रपटाविषयी संगीतकार अमितराज लोकमत सीएनएक्सला सांगतो, प्रेक्षकांची ही लाडकी गायिका श्रेया घोषालसोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. तिने पहिल्यांदा माझं गाणं गायलं आहे. त्यामुळे खरचं मी खूप आनंदित आहे. देवा या चित्रपटासाठी आम्ही दोघे एकत्रित आलो आहोत. या चित्रपटातील एका गाण्याला मी संगीत दिले असून श्रेयाने या गाण्याला आवाज दिला आहे. त्यामुळे खूप भारी वाटत आहे. मी संगीत दिलेल्या गाण्यावर श्रेयाने गाणे हे माझे खूप दिवसांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. तसेच हा माझ्यासाठी एकंदरीतच  दैवी अनुभव होता. खरं सांगू का, श्रेयाचा मी जबरदस्त  फॅन आहे. श्रेयाने आपल्या संगीतावर गाणं गायिले पाहिजे हे प्रत्येक संगीतकारासाठी मोठी गोष्ट असते. मात्र देवा या चित्रपटाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. त्याचप्रमाणे मला ही संधी केवळ अभिनेता अकुंश चौधरी आणि विजय दयाल यांच्यामुळे मिळाल्याने त्यांचे आभार मानतो असेदेखील तो यावेळी म्हणाला. हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहीले आहे. देवा हा आगामी चित्रपट असून या चित्रपटात प्रेक्षकांना अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, स्पृहा जोशी आणि अकुंश चौधरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यात श्रेयाच्या आवाजाची जादू असल्याने नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे असे वाटते.