Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते स्पृहाचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 13:30 IST

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या अभिनयासाठी, कविता लेखनासाठी आणि गीतकार म्हणून जास्त लोकप्रिय आहे. मराठी सिनेसृष्टीत स्पृहा बेस्ट निवेदक म्हणून ...

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या अभिनयासाठी, कविता लेखनासाठी आणि गीतकार म्हणून जास्त लोकप्रिय आहे. मराठी सिनेसृष्टीत स्पृहा बेस्ट निवेदक म्हणून पण ओळखली जाते.  नुकतंच तिने गोवा येथे गोवा कला अकादमी कार्यक्रमाचे निवेदन केले होते. 

डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते स्पृहा जोशीचा सन्मान करण्यात आले. यामुळे स्पृहाच्या यशामध्ये आणखी भर पडली. स्पृहाचा सन्मान हा तिच्या फॅन्ससाठी अभिमानाची बाब आहे.