Join us

अ डॉट कॉम मॉम प्रदर्शित होणार 30 सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 13:45 IST

जगात देवानंतर आईचं स्थान मानलं जातं. मुलांसाठी निस्वार्थ मनाने झटणाऱ्या आईचे मन निर्मळ आणि प्रेमळ असते. प्रत्येक आई आपल्या ...

जगात देवानंतर आईचं स्थान मानलं जातं. मुलांसाठी निस्वार्थ मनाने झटणाऱ्या आईचे मन निर्मळ आणि प्रेमळ असते. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी तडजोडी करत असते. अशाच एका साध्या भोळ्या आईची कथा आपल्याला अ डॉट कॉम मॉम या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नाट्यसृष्टीत आपले नाते खणखणीत वाजवणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर अ डॉट कॉम मॉम’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. आपल्या मुलाच्या आग्रहाखातर अमेरिकेत गेलेल्या आईची उडणारी तारांबळ या चित्रपटात विनोदी पध्दतीने मांडण्यात आली आहे. एकीकडे मॉडर्न सून तर दुसरीकडे आपला मुलगा यांच्या अपेक्षांचं ओझं पाठीवर घेऊन ही आई वेगवेगळे कर्तब करताना आपल्याला दिसते.नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मुलगा – सूनेमध्ये या आईची उडणारी धावपळ दाखवण्यात आली आहे. अमेरिकेत चित्रित झालेला हा पहिलाच मराठी सिनेमा...ज्यात भारतीय आईचा अमेरिकन मॉम पर्यंतचा प्रवास विनोदाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. सुंदरा मनामध्ये भरली आणि अवघा रंग एकचि झाला अशी दर्जेदार नाटके मराठी नाट्यसृष्टीला देणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर यांची निर्मिती असलेला हा “अ डॉट कॉम मॉम”... गेली अनेक वर्ष त्यांनी रविवारच्या सामना या दैनिकात तर लोकप्रभा या मासिकात लिखाण केले, तसेच 'धन्य ती गायनॅक कला' आणि 'ठसे माणसांचे'यांसारखी पुस्तकेही लिहिली.cnxoldfiles/span>असा हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.