Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तेजश्री प्रधानचे पहिले प्रेम तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 11:19 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाची एक वेगळी आणि खास जागा असते. आपल्या पहिल्या प्रेमासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खूपच खास ...

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाची एक वेगळी आणि खास जागा असते. आपल्या पहिल्या प्रेमासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खूपच खास असतो. कितीही वर्ष उलटून गेली तरी त्या आठवणी काही पुसल्या जात नाहीत. पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ती सध्या काय करते या चित्रपटात तेजश्री प्रधान झळकली होती. या चित्रपटात तिने तन्वी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तन्वीचे पहिले प्रेम अनुराग असल्याचे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळाले होते. तन्वीचे लग्न होते, तिला मुलगी होते तरीही ती तिचे पहिले प्रेम विसरलेली नसते. याच तन्वीप्रमाणे तेजश्री प्रधानदेखील तिच्या खऱ्या आय़ुष्यातील पहिले प्रेम अद्याप विसरलेली नाही असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला पटेल का? हो, पण हे खरे आहे. तेजश्री अद्याप तिचे पहिले प्रेम विसरलेली नाही आणि या पहिल्या प्रेमाविषयी तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले आहे. तेजश्रीचे हे पहिले प्रेम खूपच खास आहे.तेजश्रीचे पहिले प्रेम कोणीही सामान्य व्यक्ती नाही तर एक प्रसिद्ध क्रिकेटर आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटर ब्रेड ली तेजश्रीला प्रचंड आवडतो आणि हेच तिचे पहिले प्रेम असल्याचे तिने कबूल केले आहे.तेजश्रीला ब्रेट ली किती आवडतो हे तिच्या फॅन्सना देखील चांगलेच माहिती आहे. त्यामुळे तिच्या एका फॅनने तिला नुकतेच एक छान गिफ्ट दिले आहे. तिला फॅनने एक किचेन गिफ्ट दिले असून या किचेनमध्ये तेजश्री आणि ब्रेट ली या दोघांचेही फोटो आहेत. हे किचेन पाहून तेजश्रीला प्रचंड आनंद झाला आहे. तिने या किचेनचा व्हिडिओ ट्विटर या सोशल नेटवर्किंगवर टाकून आपल्या फॅनचे आभार मानले आहेत आणि त्याचसोबत हो, ब्रेट ली हे माझे पहिले प्रेम आहे असे म्हणत आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे.Also Read : कोणाला भेटून तेजश्री प्रधानला झाला आनंद?Also Read : तेजश्री प्रधानने दिले तिच्या आयुष्यातील 'या' खास व्यक्तीला सरप्राइज