डिस्को सन्याच्या निमित्ताने संगीतातील आगळा वेगळा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 13:34 IST
वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून दाखल झालेले आणि शास्त्रीय संगीताबरोबरच पश्चिमात्य संगीताचा अभ्यास यामुळे अनेक चित्रपटांमध्ये प्रयोगात्मक अविष्काराचं स्वरुप दाखविणारे संगीतकार अभिजीत कवठाळकर आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.आपल्या ‘वकाव् फिल्म्स’च्या बॅनर अंतर्गत त्यांचे सहकारी निर्माते सचिन पुरोहित यांच्या बरोबर ‘डिस्को सन्या’ या आगळ्यावेगळ्या ऑफबीटफिल्मची निर्मिती ते करीत आहेत. अत्यंत कल्पक, मधूर संगीत व तेवढ्याच गोड चालींची गाणी यामुळे हा चित्रपट संगीताच्या आघाडीवरहीबहुप्रतिक्षीत ठरेल यात शंका नाही. ...
डिस्को सन्याच्या निमित्ताने संगीतातील आगळा वेगळा प्रयोग
वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून दाखल झालेले आणि शास्त्रीय संगीताबरोबरच पश्चिमात्य संगीताचा अभ्यास यामुळे अनेक चित्रपटांमध्ये प्रयोगात्मक अविष्काराचं स्वरुप दाखविणारे संगीतकार अभिजीत कवठाळकर आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.आपल्या ‘वकाव् फिल्म्स’च्या बॅनर अंतर्गत त्यांचे सहकारी निर्माते सचिन पुरोहित यांच्या बरोबर ‘डिस्को सन्या’ या आगळ्यावेगळ्या ऑफबीटफिल्मची निर्मिती ते करीत आहेत. अत्यंत कल्पक, मधूर संगीत व तेवढ्याच गोड चालींची गाणी यामुळे हा चित्रपट संगीताच्या आघाडीवरहीबहुप्रतिक्षीत ठरेल यात शंका नाही. सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटात सुपरहिट गाणे देणारे गायक शबाब साबरी यांना प्रथमच मराठीत उतरवून त्यांची सुफी स्टाईल आणि शाहीरनंदेश उमप यांच्या आवाजाचा मेळ करून अभिजित यांनी एकच बार उडवून दिला आहे. दक्षिण भारतात वापरले जाणारे ‘तारा तप्पट्टाई’ हे वाद्यवापरून मराठी गाण्याला ऑंथेन्टिक साऊथ इंडियन तडका देण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात हे वाद्यवाजविण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता पार चेन्नाई येथे गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे आणि ते ही दाक्षिणात्य वादकांकडूनच. त्या सर्वदाक्षिणात्य वादकांनी प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांच्याबरोबर काम केलेले आहे या चित्रपटात दाक्षिणात्य आणि मराठमोळ्या तालवाद्यांचीजुगलबंदी नव्हे तर एकाच तालाकडे जाण्याचामंत्रमुग्ध करणारा प्रवास असंच त्याच वर्णन कराव लागणार आहे. म्हणूनच ‘डिस्को सन्या’ याचित्रपटाचे संगीत व पार्श्वसंगीत या सगळ्या बाबतीत एक वेगळेपण पहायला मिळणार आहे.