Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री प्रिया बापटच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, तिच्या इतकीच दिसते खूप सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 07:00 IST

प्रिया बापट (Priya Bapat) ला सख्खी बहिण असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बापट हिने वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रिया बापट इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा ती फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिची स्टाईल स्टेटमेंट सर्वांनाच खूप भावते. तिच्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये तिच्या बहिणीचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, प्रिया बापटला सख्खी बहिण आहे जिचे नाव श्वेता आहे. तिचा देखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.

प्रिया बापटला सख्खी बहिण असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. तिच्या बहिणीचे नाव श्वेता आहे. तिचा देखील चित्रपटसृष्टीशी संबंध आहे. श्वेता बापट ही सेलिब्रेटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर आहे. प्रियाचीदेखील तिच स्टायलिस्ट आहे. प्रिया बापट शिवाय ती बऱ्याच सेलिब्रेटींसाठी स्टायलिस्ट म्हणून काम करते.

या व्यतिरिक्त प्रिया बापट आणि श्वेताचा सावेंची हा साडी ब्रॅण्ड आहे. त्यांचे सोशल मीडियावर अधिकृत पेजदेखील आहे. या अकाउंटवर साड्यांचे कलेक्शन पहायला मिळतात. प्रिया आणि श्वेता या दोघींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. प्रिया बापटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने नुकतेच एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे विस्फोट. या चित्रपटात प्रियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात क्रिस्टल डिसुझादेखील पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :प्रिया बापट