हिंदी आणि तेलुगू सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागे आता पुन्हा एकदा मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आलेला देवदत्त नागे पुन्हा एकदा नव्या आणि दमदार अवतारात दिसणार आहे. आपल्या भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागे याचा ‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटातील लूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटामधील ‘खंग्री’ या त्याच्या भूमिकेचा लूक समोर आला आहे. तीक्ष्ण नजर आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स यामुळे त्याच्या या व्यक्तिरेखेभोवती रहस्यमय आकर्षण निर्माण झालं आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात केलेला बदल, त्यासाठी घेतलेली मेहनत यातून त्याचा हा लूक अधिक प्रभावी ठरणार असल्याचं दिसत आहे. काहीतरी वेगळं सादर करण्याची देवदत्त नागे याची खासियत या नव्या अवतारातूनही ठळकपणे दिसून येत आहे. प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता असून, देवदत्त नागेच्या या दमदार लूकमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या चित्रपटासाठी लाभली आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ या निर्मितीसंस्थे अंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Web Summary : Devdatta Nage returns to Marathi cinema with 'Ghabadkund', showcasing a striking new look as 'Khangri'. His intense presence and transformation have heightened anticipation for this cinematic universe, releasing June 19th, promising a thrilling experience.
Web Summary : देवदत्त नागे 'घबाडकुंड' के साथ मराठी सिनेमा में वापसी कर रहे हैं, जिसमें 'खंग्री' के रूप में उनका नया रूप सामने आया है। उनकी तीव्र उपस्थिति और परिवर्तन ने 19 जून को रिलीज होने वाले इस सिनेमाई ब्रह्मांड के लिए प्रत्याशा बढ़ा दी है, जो एक रोमांचक अनुभव का वादा करता है।