डॅशिंग मुंबई संघाचा दमदार जर्सी लॉन्च सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 14:59 IST
मराठी बॉक्स क्रिकेट लीग सिझन 3 मधील डॅशिंग मुंबई संघाचा दमदार जर्सी लॉन्च सोहळा मुंबईतील एका शानदार हॉटेल मध्ये ...
डॅशिंग मुंबई संघाचा दमदार जर्सी लॉन्च सोहळा
मराठी बॉक्स क्रिकेट लीग सिझन 3 मधील डॅशिंग मुंबई संघाचा दमदार जर्सी लॉन्च सोहळा मुंबईतील एका शानदार हॉटेल मध्ये बुधवारी पार पडला.यावेळी सुयश टिळक, माधव देवचक्के , सर्वेश परब,सिद्धांत मुळे,सुशांत शेलार दीप्ती देवी आदि कलाकार उपस्थित होते. या टीम चे कॅप्टन अजित परब यांनी शिवाजी राजे भोसले बोलतोय चित्रपटातील ओ राजे.. हे गाणे एकवून टीम ला प्रोत्साहित केले. गतवर्षी उपांत्य फेरी पर्यंत पोहोचलेली डॅशिंग मुंबई टीम यावर्षी अंतिम फेरीत पोहचते का याबाबत उत्सुकता आहे. यंदा ४ ते ६ मे दरम्यान कोल्हापूरच्या शाहू स्टेडीयम येथे मराठी बॉक्स क्रिकेट लीग सीजन ३ चे सामने पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळले जाणार आहेत.