Dashavtar: मराठीतील बहुप्रतीक्षित 'दशावतार' सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमातून दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाच्या ताकदीचं दर्शन घडवून आणलं. कोकणातील परंपरा आणि दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयाने नटलेला 'दशावतार' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. अजूनही 'दशावतार'चे शो हाऊसफूल होत आहेत.
'दशावतार'ला दोन आठवडे प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. पहिल्या आठवड्यात सिनेमाने १० कोटींचं कलेक्शन केलं. तर दुसऱ्या आठवड्यातही जवळपास ९.५ कोटींचा गल्ला जमवला. आता १६ दिवसांचं कलेक्शन समोर आलं असून आत्तापर्यंत 'दशावतार'ने बॉक्स ऑफिसवर १९ कोटींचा गल्ला पार केला आहे. आता येत्या वीकेंडला सिनेमा किती कमाई करतो हे पाहावं लागेल.
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. तर त्यांच्या लेकाची भूमिका सिद्धार्थ मेनन याने साकारली आहे. भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर, विनोद तावडे अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
Web Summary : Marathi film 'Dashavatar,' starring Dilip Prabhavalkar, continues its successful run. After 16 days, the movie has earned ₹19 crore. The film has received a great response.
Web Summary : दिलीप प्रभावळकर अभिनीत मराठी फिल्म 'दशावतार' का सफल प्रदर्शन जारी है। 16 दिनों के बाद, फिल्म ने ₹19 करोड़ कमाए। फिल्म को दर्शकों से अच्छी प्रतिक्रिया मिली है।