Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया बापटने सोशल मीडियावरून दिली गुड न्यूज, फॅन्सनी दिल्या भरभरून शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 12:51 IST

प्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ठळक मुद्देप्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा पुण्यातील प्रयोग हाऊसफुल झाला असल्याचे ती या व्हिडिओद्वारे सांगत आहे.

२०२० मध्ये कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे भारतातील सगळे नाट्यगृहं बंद करण्यात आली होती. पण आता नाट्यगृहं सुरू झाली असून नाटकांना प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. नाटकांना प्रेक्षक देत असलेल्या प्रतिसादामुळे प्रिया बापट प्रचंड खूश झाली आहे.

प्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा पुण्यातील प्रयोग हाऊसफुल झाला असल्याचे ती या व्हिडिओद्वारे सांगत आहे. व्हिडिओमध्ये प्रिया बोलताना दिसत आहे की, मी सध्या बालगंधर्व नाटकाच्या परिसरात आहे. या व्हिडिओत आपल्याला हाऊसफुलचा बोर्ड दिसत असून या बोर्डवर हार घालताना मंडळी दिसत आहेत. आमचा आता प्रयोग असून आम्ही प्रयोगाच्या तयारीला जात आहोत. केवळ तुमच्यासोबत ही गुड न्यूज शेअर करायची होती असे बोलताना प्रिया दिसत आहे. या व्हिडिओत प्रियासोबतच उमेश कामत, हृता दुर्गुले यांसारखे नाटकातील कलाकार देखील दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहायला मिळत आहे. 

या व्हिडिओत उमेश बोलताना दिसत आहे की, आमच्या नाटकाचे पुण्याचे बुकिंग सांभाळणाऱ्या मंडळींच्या हातून आम्ही हा हाऊसफुलचा बोर्ड लावत आहोत. तसेच तो बालगंधर्वच्या सगळ्या व्यवस्थापनाचे आभार मानताना दिसत आहे. प्रियाच्या या पोस्टवर या नाटकाचे फॅन्स आणि प्रियाचे फॅन्स भरभरून कमेंट्स देत आहेत.

प्रिया बापट, उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटने ह्या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शिन केले आहे.नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे. बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

टॅग्स :प्रिया बापट