Join us  

cutness overloaded या बाप लेकीचा फोटो पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल, शरद केळकरने लेक किशासोबतचा गोड फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 7:15 AM

२००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले. दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं. तिचं नाव या दोघांनी प्रेमानी किशा असं ठेवलं.

अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेला शरद एक प्रेमळ पिताही आहे. २००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले. दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं. तिचं नाव या दोघांनी प्रेमानी किशा असं ठेवलं. किशा दोघांच्या जीवनातील अनमोल हिरा आहे. नुकतंच लय भारी अभिनेता शरदने त्याचा लेकीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहाणार नाही. या फोटोमध्ये बाप-लेकीचे प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. शरद लेकीच्या गालावर प्रेमाने किस केलं आहे तर किशानेहीतितक्याच लाडात आपल्या बाबाला पाऊट दिले आहे. या फोटोला शरदने एक सुंदर कॅप्शन दिली आहे. बेस्ट मॉर्निंग, किशा, डॉटर, लाईफलाइन, पाऊट, असे टॅगही त्याने दिले आहेत. लवकरच शरद माधुरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. 

‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर निर्मित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या मराठी चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. नवरात्रीच्या दिवसात टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणा-या ‘माधुरी’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा शरद या चित्रपटात प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या एका हटके रुपातून दिसणार आहे. नुकतेच, शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्वरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 

टॅग्स :शरद केळकर