Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सुनेच्या नात्यावर आधारित 'कप बशी'! पूजा सावंत-निर्मिती सावंत यांची जुगलबंदी, 'या' तारखेला सिनेमा होतोय रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 17:09 IST

वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात ​​प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.  

सासूृृ-सुनेचं नातं हे एव्हरग्रीन असतं. या नात्यामध्ये प्रेम, आदर, राग, रुसवे फुगवे अशा वेगवेगळ्या भाव-भावना असतात. याच नात्यातली एक वेगळी गोष्ट आता "कप-बशी" या आगामी चित्रपटात पाहता येणार आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात ​​प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.  अरूण आणि अरूणा हे दांपत्य त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात. परंतु ​अरूणा यांच्या अध्यात्मिक गुरूनं सूनेबाबत काही अटी सांगितल्या आहेत. त्या अटींनुसार अरूणा मुलगी शोधत असतात. त्यांना तशीच मुलगी सापडते का? नक्की अशी कोणती अट आहे? त्यांचे पुढे लग्न जुळत की नाही? अशा धमाल आशयसूत्रावर "कप बशी" हा चित्रपट आधारित आहे. आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत अत्यंत मनोरंजक पद्धतीने कथानक मांडण्यात आलं आहे. उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात असल्यानं प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन अनुभवायला मिळेल त्यासाठी ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.   

सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने "कप बशी" या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेले आहे.

चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे,आनंद इंगळे, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर, आनंद काळे अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे यात शंका नाही.गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना  चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन लाभलं आहे. बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Cup Bashi': A unique story of mother-in-law and daughter-in-law.

Web Summary : 'Cup Bashi' explores the evergreen relationship of a mother-in-law and daughter-in-law. Directed by Vaibhav Chinchalkar, the movie revolves around finding a bride based on spiritual conditions and traditions. The film releases on June 5th and stars Nirmitee Sawant and Pooja Sawant.
टॅग्स :पूजा सावंतमराठी चित्रपटमराठी अभिनेता